22 December 2024 1:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा
x

नारायण राणे म्हणाले तिथे राडाबिडा काही झाला नाही | नितेश राणे म्हणाले, नाईकांना शिवप्रसाद दिला?

BJP MP Narayan Rane

मुंबई, १९ जून | सिंधुदुर्गातल्या कुडाळ पेट्रोल पंपावर झालेल्या राड्यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या पेट्रोल पंपावर वैभव नाईक थांबला कुठे, तो पळाला. तिथे राडाबिडा काही झाला नाही, असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं

नारायण राणे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना कुडाळमधील त्यांच्या पेट्रोल पंपावरील राड्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी ही माहिती दिली. पेट्रोल पंपावर रिक्षावाले आले होते. तिथे पेट्रोल वाटलं. त्यात आंदोलन कुठे आलं? त्या ठिकाणी वैभव नाईक आला कुठे, तो तर पळाला. तो थांबलाही नाही. आजचे पेपर पाहा. राडाबिडा काही झाला नाही, असं राणे म्हणाले.

तत्पूर्वी, ‘शिवप्रसाद’ काय असतो, ते संजय राऊतांनी आमदार वैभव नाईक यांना विचारावे. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पोटभर ‘प्रसाद’ दिला आहे. पाहिजे असेल तर तुमच्यासाठी मी सामना ऑफिसमध्ये पार्सल घेऊन येतो. टेस्ट आवडेल नक्की, असे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. त्यामुळे आता संजय राऊत यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र खासदार नारायण राणे यांनी केलेल्या विधानाने आमदार नितेश राणे यांचा वैभव नाईक यांना शिवप्रसाद दिल्याचा दावा फोल ठरला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: BJP MP Narayan Rane reaction after Shivsena MLA Vaibhav Naik controversy news updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x