22 December 2024 6:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

मराठा आरक्षण | खा. संभाजीराजे उद्या घेणार शरद पवारांची भेट ! मोदींनी कधीच भेट दिली नाही

Maratha reservation

मुंबई, २६ मे | सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द ठरवल्यानंतर ते पुन्हा कसं मिळवायचं, यावर राज्य सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. यासंदर्भात मराठा आरक्षण उपसमितीच्याही बैठका सुरू आहे. मात्र, त्याचवेळी मराठी आरक्षणाचा मुद्दा सुरुवातीपासून लावून धरणारे खासदार संभाजीराजे हे देखील महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. यासंदर्भात कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, २७ मे रोजी संभाजीराजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या बंगल्यावर सकाळी ९.३० वाजता ही भेट होणार आहे. गेले अनेक दिवस राज्य आणि केंद्र सरकारमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न हेलखावे खात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदार संभाजीराजे यांना भेटण्याची वेळ देत नाही आहेत. यावरुन एकीकडे राजकारण पेटलेले असताना आता संभाजीराजे थेट शरद पवारांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर काही तोडगा निघतो का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एक बैठक झाली आहे. शरद पवार हे सायंकाळच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर शरद पवार आणि मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास 40 मिनिटे बैठक झाली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पित्ताशयाचं ऑपरेशन झाल्यानंतर तब्बल महिन्याभरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आज संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास पवारांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तब्बल अर्धा तास ही बैठक झाली. बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे समजू शकले नाही. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या प्रकृतीची चौकशी केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत झालेली खडाजंगी आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आलेल्या आक्षेपावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बैठकीच्या संदर्भात अधिकृत माहिती मिळाली नसली तरी मराठा समाजाला विश्वासात कसं घ्यायचं या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

 

News English Summary: On May 27, Sambhaji Raje will meet NCP President Sharad Pawar. The meeting will be held at Sharad Pawar’s Silver Oak bungalow in Mumbai at 9.30 am. For the last several days, the issue of Maratha reservation has been simmering in the state and central governments. Prime Minister Narendra Modi is not giving time to meet MP Sambhaji Raje.

News English Title: BJP MP Sambhajiraje Chhatrapati will meet Sharad Pawar over Maratha Reservation issue news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x