28 January 2025 7:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

महाराष्ट्रात कोरोना स्थिती चांगल्याप्रकारे हाताळण्यावरून भाजप खासदाराची ठाकरे सरकारला शाबासकी

BJP MP Subramanian Swamy

मुंबई, ०२ मे | राज्यातील प्रचंड आव्हानात्मक कोरोनास्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठाकरे सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी कौतुक केलं आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी काल (१ मे) याबाबतचे ट्विट केले आहे. “राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या स्थिरावल्याबद्दल ठाकरे सरकारला शाबासकीची थाप मिळायला हवी. मला मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात हॉस्पिटलही आता सज्ज झालेली आहेत.

राज्यातील कोरोनास्थिती अशीच पुढेही स्थिरावत गेली तर ठाकरे सरकार शाबासकीची मोठी थाप मिळण्यास पात्र आहे”, असेही पुढे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. राज्यात कोरोनास्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने ब्रेक द चेनअंतर्गत कडस निर्बंधांची घोषणा केली आहे. यामुळे राज्यातील आकडा कमी झाला नसला तरीही तो वाढलेलाही नाही. स्थिरावला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित राज्यांमध्ये सध्या महाराष्ट्राचा समावेश होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे. मात्र, ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.

 

News English Summary: BJP’s Rajya Sabha MP Subramaniam Swamy has lauded the efforts of the Thackeray government to control the hugely challenging Corona situation in the state. Subramaniam Swamy tweeted about this yesterday (May 1). “The Thackeray government should be applauded for stabilizing the number of coronary heart disease patients in the state. As far as I know, hospitals in Maharashtra are now ready.

News English Title: BJP MP Subramanian Swamy praises Thackeray government over covid situation handling news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x