22 April 2025 6:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

भाजप खासदार उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरे यांच्या भेटीला

BJP MP Udayan Raje Bhosale, Krishnakunj, MNS president Raj Thackeray

मुंबई, २७ फेब्रुवारी: भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले हे कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. या भेटीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. मात्र, मराठा आरक्षणा संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उदयनराजे भोसले हे आज संध्याकाळी 5 वाजता कृष्णकुंजवर पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी आहेत. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचं कारण समजू शकलेलं नाही. मात्र, मराठा आरक्षण आणि राज्यातील राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने या दोन्ही नेत्यांमध्ये खलबत होण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच उदयनराजे भोसले हे राज ठाकरे यांना भेटत असल्याने या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

विशेष म्हणजे, उदयनराजे यांची कृष्णकुंजवर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्याशी भेट होत असल्यानं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यात आज मराठी भाषा दिनाच्या दिवशी ही भेट होत आहे. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर उदयनराजे प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता वर्तविण्यात आहे. त्यामुळे राज यांच्या भेटीनंतर उदयनराजे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

 

News English Summary: Bharatiya Janata Party MP Udayan Raje Bhosale has gone to Krishnakunj to meet MNS president Raj Thackeray. The exact reason for this visit was not understood. However, there is a possibility of a discussion between the two leaders regarding Maratha reservation.

News English Title: BJP MP Udayan Raje Bhosale reached to Krishnakunj to meet MNS president Raj Thackeray news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Udayanraje Bhosale(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या