22 February 2025 4:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात
x

खासदार, आमदारांच्या २ वर्षांच्या निधीवरून उदयनराजेंचा केंद्र आणि राज्य सरकारला सवाल

BJP MP Udayanraje Bhonsale, Union Govt, State Government

सातारा, २६ ऑक्टोबर : राज्यातील कोरोना परिस्थितीवरुन खासदार उदयनराजे (BJP MP Udayanraje Bhonsale) यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. खासदार, आमदारांचे दोन वर्षांचे निधी (MP and MLA Two Years Fund) तुमच्याकडे घोटवून घेतले? त्याचं केंद्र, राज्याने काय केले ते कुठे गेले? गोर गरिबांना सुख-सुविधा मिळत नाहीत, याचं उत्तर केंद्र आणि राज्य शासनाने दिलेच पाहिजे, असा थेट सवाल उदयनराजे यांनी विचारला आहे. कोरोना परिस्थितीमुळे साताऱ्यातील दसरा उत्सव साध्यापणाने साजरा करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उदयनराजे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

खासदार आणि आमदारांचे तुम्ही दोन वर्षांचे निधी तुमच्याकडे घोटवून घेतले त्याचं केंद्र आणि राज्य सरकारनं काय केलं ते गेले कुठे? दिवस रात्र एकच झाली आहे. आम्हाला बेड पाहिजेत, ऑक्सिजन पाहिजेत, असे फोन येतात. माझा एकच प्रश्न हे घोटून घेतलेले पैसे गेले कोठे? गोर गरिबांना सुख-सुविधा मिळत नाहीत. याचं उत्तर केंद्र आणि राज्य शासनाने दिलच पाहिजे. आता लोकांनी जाब विचारणं गरजेचे आहे, असेही ते म्हणाले आहेत.

 

News English Summary: BJP MP Udayanraje Bhonsale has strongly criticized the Center and the state government over the Corona situation in the state. MP, MLA Two Years Fund (MP and MLA Two Years Fund) with you? Its center, where did the state go? Udayan Raje has directly asked that the answer should be given by the Central and State Governments that the extremely poor do not get amenities.

News English Title: BJP MP Udayanraje Bhonsale criticized Union and State Government News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Udayanraje Bhosale(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x