15 November 2024 7:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

मराठा आरक्षण | खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

BJP MP Udayanraje Bhosale, CM Uddhav Thackeray, Maratha reservation

मुंबई, १७ फेब्रुवारी: मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे अधिक आक्रमक झाले आहे. नवी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले मुंबईच्या दौऱ्यावर आहे. आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गेले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षण संदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उदयनराजे भोसले यांचे मुख्यमंत्र्यांना 5 प्रश्न:

  • जर एसईबीसी उमेदवाराने ईडब्यूएस कोट्यातून आरक्षण स्वीकारलं तर सर्वोच्च न्यायालयातील केसवर काही परिणाम होणार आहे का?
  • जर मोठ्या प्रमाणावर ईडब्यूएस आरक्षण स्वीकारलं तर त्याचा या केसवर काही परिणाम होणार आहे का ?
  • ईडब्यूएस आरक्षण रद्दबातल ठरवल तर त्याचा मराठा समाजातील उमेदवारांवर काही परिणाम होईल का ?
  • महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ कमिटीने सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यासंबधी जे काही निर्णय घेतले आहेत. ते समाजासमोर आले पाहिजेत. जेणेकरुन खटल्यात सरकारकडून वकिलांना नेमके काय निर्देश दिले गेले आहेत याचा खुलासा होईल.
  • MPSC च्या माध्यमातून निवड झालेल्या 2150 उमेदवारांसाठी सुपर न्युमररी पोस्ट निर्माण करून त्यांना नोकरीत सामावून का घेत नाही?

 

News English Summary: BJP’s Rajya Sabha MP Udayan Raje Bhosale has become more aggressive on the issue of Maratha reservation. After meeting NCP president Sharad Pawar in New Delhi, he today called on state Chief Minister Uddhav Thackeray.

News English Title: BJP MP Udayanraje Bhosale meets CM Uddhav Thackeray asks 5 questions about Maratha reservation news updates.

हॅशटॅग्स

#Udayanraje Bhosale(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x