22 December 2024 2:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
x

भाजपाला कोरोनाचं काही पडलेलं नाही | केवळ आम्ही सत्तेत कसं येऊ शकतो याकडेच लक्ष

BJP, Sharad Pawar, Jayant Patil, Devendra Fadnavis

मुंबई, ०१ एप्रिल: राज्यात सध्या अनेक विषयांवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अहमदाबादमध्ये शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाली असं वृत्त समोर आलं आणि महाराष्ट्रात राजकीय वारे वाहण्यास सुरुवात झाली. अर्थात राष्ट्रवादीने ही भेट झाली नसल्याचे म्हटले असले तरी चर्चा या सुरुच आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुजरातमध्ये जाऊन अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जाऊ लागले आहेत. यासंदर्भात आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी साखर उद्योगातील परिषदेसाठी पवार साहेब अहमदाबादला गेले होते, असं स्पष्ट केलं. पवार-शहा यांच्या भेटीच्या बातम्या उठवण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडून सतत करत आहे. आमची महाविकास आघाडी तोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून हे प्रयत्न सुरू आहेत, असं पाटील यांनी सांगितलं. याआधी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनीदेखील अशाच प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मात्र केंद्रातील नेतृत्वानं आदेश दिल्यास अंमलबजावणी करू, अशी भूमिका घेतली.

जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस भाजप जवळ जाणार नाही. आमची विचारधारा वेगळी आहे. म्हणून पवार साहेबांनी महाविकास आघाडी स्थापन केली. या चर्चांमध्ये अर्थ नाही. महाविकास आघाडी भक्कम आहे. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला कोरोनाचे काही पडले नाही. काही झालं तरी आम्ही सत्तेत कसं यावं याकडे त्यांचं लक्ष आहे.

 

News English Summary: Jayant Patil said that NCP will not go near BJP. Our ideology is different. So Pawar Saheb established Mahavikas Aghadi. There is no point in these discussions. The Mahavikas front is strong. He said the Bharatiya Janata Party did not worried about Corona situation. No matter what happens, their focus is on how we come to power again.

News English Title: BJP never worried about corona pandemic said minister Jayant Patil news updates.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x