8 January 2025 12:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: YESBANK Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, या फंडात मल्टिबॅगर परतावा मिळेल, 130 टक्क्याने कमाई करा SBI Mutual Fund | बिनधास्त महिना बचत करा SBI फंडाच्या या योजनेत, SIP वर मिळेल 1 कोटी 22 लाख रुपये परतावा EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स
x

भागवत कराडांची जनआशीर्वाद यात्रा गोपीनाथ गडापासून | तर लातूर ओबीसी महामेळाव्याचे अध्यक्ष दुसरे कराड?

OBC Reservation

लातूर, १३ ऑगस्ट | कायद्यानं मिळालेलं आरक्षण राज्य सरकारच्या दूर्लक्षामुळे रद्द झालं याबाबत ओबीसी इतर मागासवर्गीयात जनजागृती करण्यासाठी आणि हक्काचे आरक्षण परत मिळवून घेण्यासाठी उद्या (१४ ऑगस्ट) रोजी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी भटक्या विमुक्त जातीचा महाजागर महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

मराठा,ओबीसी समाजाला मिळलेले आरक्षण राज्‍यातील महाविकास आघाडी सरकारने न्‍यायालयात व्‍यवस्थित बाजू मांडली नसल्‍याने रद्द झाले. घटनेने दिलेले ओबीसीच्‍या हक्‍काचे आरक्षण सन्‍मानाने परत मिळावे यासाठी आणि आरक्षणाबाबत जनजागृती व्‍हावी याकरीता लातूर जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने १४ ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी ११ वाजता लातूर येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.रमेश कराड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींच्या महाजागर महामेळाव्याचे उद्घाटन भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे.

लातूर येथील गिरवलकर मंगल कार्यालय बार्शी रोड जुनी रेल्वे लाईन याठिकाणी होणाऱ्या या महाजागर महामेळाव्यास ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातीतील समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, भाजपा ओबीसी मोर्चाचे कोषाध्यक्ष गोविंद चिलकुरे, मराठवाडा संपर्क प्रमुख डॉ. बाबासाहेब घुले जिल्हाध्यक्ष बापुराव राठोड जिल्हा प्रभारी गोरोबा गाडेकर यांच्यासह अनेकांनी केले आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा गोपीनाथ गडावरुन निघणार:
राजधानी दिल्लीत झालेल्या भाजप नेत्यांच्या बैठकीत नवनियुक्ती केंद्र मंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा औरंगाबाद, नांदेड, परभणी आणि जालना जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मात्र, कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेतून बीड जिल्हा वगळण्यात आल्याची चर्चा सुरु होती. मात्र, आता कराड यांची जनआशीर्वाद यात्रा गोपीनाथ गडावरुन निघणार आहे. इतकंच नाही तर या यात्रेला पंकजा मुंडे हिरवा झेंडा दाखवणार आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी दिली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP OBC politics in Marathwada news updates.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x