जलयुक्त शिवार चौकशीबाबत आणि खडसे भाजप सोडणार का | काय म्हणाल्या पंकजा...
मुंबई, १६ ऑक्टोबर : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ते लवकरच राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश करतील असेही बोलले जात आहे. मात्र, एकनाथ खडसे हे भाजप सोडून जाणार नाहीत याची मला खात्री आहे. खडसे हे अनुभवी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.
विधानसभेत पराभव झाल्यानंतर पंकजा मुडे या देखील नाराज होत्या. त्यांनी अनेकवेळा आपली नाराजी बोलून दाखवली होती. एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे या दोघांनीही एकत्रितपणे जाहीर कार्यक्रमांमधून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. मात्र, नुकतीच पंकजा मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपाने त्यांची नाराजी दूर केलीय असं म्हटलं जात आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी म्हटलं की, “जलयुक्त शिवार योजनेचा उद्धेश अत्यंत चांगला आणि लोकहिताचा आहे. चौकशी लावावी की नाही हा राज्य सरकारचा प्रश्न आहे. बीडमध्ये पाणी आडवा, पाणी जिरवा याचा किती फायदा झाला की हे लोकांना माहिती आहे. ही लोकांची योजना आहे”.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलताना यावर प्रतिक्रिया दिली. “हे जाणुनबुजून करत नाही. कॅगच्या अहवाल दोन दिवसांच्या अधिवेशनात सादर करण्यात आला होता. कॅगच्या अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. तशा पद्धतीच्या सूचना गेल्या आहेत”.
News English Summary: There is talk in political circles that senior BJP leader Eknath Khadse is preparing to leave the party. He is also rumored to be joining the NCP soon. However, I am sure that Eknath Khadse will not leave the BJP. Khadse is an experienced and senior leader of the party, said Pankaja Munde while talking to a private news channel.
News English Title: BJP Pankaja Munde on Jalyukt Shivar Scheme Maharashtra Government News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना