23 December 2024 12:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

भास्कर जाधव यांच्या विरोधात भाजपनेच खोटी स्टोरी रचली होती? | अधिवेशनापूर्वीची जाधवांची ती वक्तव्य जिव्हारी?

MLA Bhaskar Jadhav

मुंबई, ०६ जुलै | अधिवेशनाचा पहिला दिवस राहिला तो खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या नावावर. ओव्हर कॉन्फिडन्ट भाजपला महाविकास आघाडीने असं काही कोंडित पकडलं की भाजप बॅकफूटवर गेलं. अधिवेशन सुरु होण्याच्या अगोदर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एमपीएससी, अशा विषयांवरुन विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांची अशी कोंडी करणार की सरकारला प्रश्नांची उत्तरे देता देता नाकी नऊ येणार असं चित्र होतं. भाजपनेही पहिल्या अर्ध्या तासात आक्रमक होत याचे संकेत दिले. मात्र तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव विराजमान झाले आणि चित्रच पालटलं.

दरम्यान, भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ नागपुरात आज भाजपने आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात हे आंदोलन केलं गेलं. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडी सरकारच्या नेते, मंत्र्यांचे पुतळे जाळण्यात आले. नागपुरातील बडकस चौकात हे आंदोलन झालं.

शिवसेना नेते भास्कर जाधव हे तालिका अध्यक्ष म्हणून विराजमान झाले आणि ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा चर्चेला आला. मोदी सरकारनं म्हणजेच केंद्रानं ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेला डाटा केंद्रानं द्यावा अशी मागणी करणारा ठराव मांडण्यासाठी भूजबळ उठले. त्याला विरोधी पक्षातल्या नेत्यांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली. त्याचं म्हणनं होतं की, या ठरावाची नोटीस नाही, हे असं करणं नियमात बसत नाही, फडणवीस विविध कामकाज नियमांचा हवाला देत आक्रमक झाले.

भास्कर जाधवांनी फडणवीस कसे चुकले हे सांगण्याचा प्रयत्न केला. फडणवीस जे काही मुद्दे मांडतायत त्याकडे दुर्लक्ष करुन जाधव भुजबळांना ठराव मांडायला सांगत होते. त्यावर विरोधी पक्ष आक्रमक होत होता. शेवटी त्याच गोंधळात भास्कर जाधवांनी तो ठराव मांडून घेतला, आम्हाला आमचे मुद्दे मांडू द्या म्हणून फडणवीस आक्रमक झाले. भास्कर जाधवांनी त्याच स्थिती मताला टाकलेला प्रस्ताव मंजूर झाल्याचं जाहीर केलं.

त्यानंतर गोंधळाची ठिणगी पडली ती इथेच आणि भाजपाचे आमदार संजय कुटे, गिरीश महाजन हे अध्यक्षाच्या थेट व्यासपीठावर गेले. संजय कुटे तेवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी भास्कर जाधवांच्या समोरचा माईक खेचला. त्यावर जाधवांनी त्यांना इशारा केला. नंतर कुटेंनी तो माईक सोडला पण तोपर्यंत जो गोंधळ, वाद, गदारोळ व्हायचा तो होऊन गेला. सभागृह 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.

सभागृहातल्या गोंधळानंतर उपाध्यक्ष झिरवळ यांच्या कॅबिनमध्येही मोठा गोंधळ झाला. तिथं प्रत्यक्ष काय घडलं याचं फुटेज कुणाकडेच नाही. पण दारात भाजपच्या आमदारांनी केलेली गर्दी स्पष्टपणे दृश्यांमध्ये दिसते. पंधरा मिनिटं संपल्यानंतर पुन्हा भास्कर जाधव सभागृहात आले आणि झिरवळांच्या कॅबिनमध्ये त्यांना आई बहिणीवर भाजपच्या आमदारांनी शिविगाळ केल्याचा आरोप केला. भास्कर जाधवांनी काय घडलं हे सांगितल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला. तो मंजूरही झाला. दुसरीकडे भास्कर जाधव यांनीच शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपच्या निलंबित आमदारांनी केला.

भास्कर जाधव यांच्याविरोधात खोटी स्टोरी भाजपने तर रचली नव्हती आणि का?
अधिवेशापूर्वी ओबीसी आरक्षांवरून भाजप नेत्यांची आंदोलनं सुरु असताना आमच्या हाती सूत्र द्या, चार महिन्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत नाही केलं तर राजकारणातून संन्यास घेईन, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावाच, त्यामुळे मराठी माणसाचा जाच तरी संपेल असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला होता, परंतु तो भाजपला झोंबला होता.

तत्पूर्वी, महाराष्ट्रातील मराठी माणसाला संपवण्याचा विडा भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी उचलला आहे. असा घणाघात शिवसेना प्रवक्ते तथा आमदार भास्कर जाधव यांनी केला होता. २५ जूनला खेडमधील कोरेगाव येथे कोविड सेंटरच्या उद्घाटनाला आले असताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. तसेच केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र बाकी सगळे इंद्र, आणि तोच प्रकार आज देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत सातत्याने घडतोय, त्यांनी फक्त टीका करावी, आरोप करावेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि संस्काराला काळिमा फासण्याचे काम करावे एवढेच त्यांचे काम सुरू आहे. असा आरोप त्यांनी केला होता. त्यासंदर्भात वृत्त पसरल्याने भाजप नेत्यांमध्ये आणि विशेष करून फडणवीसांमध्ये राग होता असं म्हटलं जातंय. त्याचाच प्रत्यय काल पाहायला मिळाला. विशेष म्हणजे भाजपमधील आयात नेत्यांना देण्यात आलेल्या जवाबदारीवरून तरी तसेच संकेत मिळत आहेत की भाजपनेच खोटी स्टोरी रचली होती.

 

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP Party aggressive against Shivsena MLA Bhaskar Jadhav during assembly session news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x