21 April 2025 3:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

मराठा समाजाचं आंदोनल 'हायजॅक' करण्याचा राजकीय डाव? | भाजपाची थेट नैतृत्वाची तयारी

BJP Party, Trying to highjack, Maratha community movement, Chandrakant Patil

मुंबई, २५ नोव्हेंबर: मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. SEBC प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. ९ सप्टेंबर २०२० नंतरचे सर्व प्रवेश SEBC वर्गासाठी आरक्षित न ठेवता करण्याचा ठाकरे सरकारनं निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभुमीवर आता मराठा समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा घात केलाय, असे विनोद पाटील म्हणाले.

दुसरीकडे “विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबविता येणार नाही. SEBC मधून अ‍ॅडमिशन घेता येणार नाही, त्याऐवजी खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेता येईल”, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले आहेत. मुंबईत ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. “मराठा आरक्षणाला स्थगिती देणार नाही, चुकीचा गैरसमज काही संघटना मुद्दाम पसरवत आहेत, असा खुलासाही अशोक चव्हाणांनी केला आहे. घटनापीठ स्थापन करण्यासाठी चार वेळा लेखी अर्ज सरकारने न्यायालयात केला. न्यायालय तारीख देईल, त्यावर टिपण्णी करणे योग्य नाही”, असंही अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

राज्य सरकारचा मराठा समाजाप्रति असलेला द्वेष सारखा दिसून येत आहे. सरकार पुन्हा पुन्हा मराठा विद्यार्थ्यांचा विश्वासघात करत आहे. यांचे सर्वच निर्णय मराठा समाजासाठी धक्कादायक ठरत आहेत. सर्व संघटनांनी एकत्र येऊन जर निर्णय घेतला, तर भाजपा या आंदोलनाचं नेतृत्व करण्यास तयार आहे.” असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

तसेच, ९ सप्टेंबरपासून आतापर्यंत मराठा आरक्षणाबाबत कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. तिघांमधील वादामुळे मराठा आरक्षणाचं मातेरं झालं आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थांबाबत राज्य सरकारने पुन्हा एकदा कसलेही नियोजन न करता चुकीचा निर्णय घेऊन त्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकावर केला आहे.

 

News English Summary: The hatred of the state government towards the Maratha community is similar. The government is again betraying the Maratha students. All his decisions are shocking for the Maratha community. If all the organizations come together and take a decision, then BJP is ready to lead this movement. ” This statement has been made by BJP state president Chandrakant Patil.

News English Title: BJP Party is trying to highjack Maratha community movement news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या