23 February 2025 2:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

VIDEO पुरावे: ईव्हीएमवर जी शंका राज ठाकरे आणि विरोधकांनी घेतली, ती भाजपला देखील

Raj Thackeray, MNS, EVM, BJP, Narendra Modi, Amit Shah, EVM, Ballet Paper, EVM Hacking

वर्धा: ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरनं निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी गुणवत्ता असलेल्या आमदार-पदाधिकारी व अन्य नेत्यांना भाजपात सुरू असलेला प्रवेश आता बंद झाला असला तरी विदर्भातील नेत्यांचे आम्ही स्वागत करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले आहे. ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करणे हे अविश्वास दर्शविण्यासारखे आहे. ते न करता आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, एनसीपी नेते जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे सगळेजण ईव्हीएमला विरोध दर्शवत आहेत. विरोधकांची पत्रकार परिषदही पार पडणार आहे. आगामी निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशी मागणी होते आहे. याचसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ईव्हीएमला विरोध करणाऱ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे म्हटले आहे.

महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीस वर्धा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दुष्काळमुक्ती हे आमचे यापुढील ध्येय असेल. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून गेल्या ५ वर्षांत केलेली कामे जनतेला सांगत आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर भूमिका घेण्यासाठी एकत्र येणाऱ्या विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. ईव्हीएमवर अविश्वास दाखवणं म्हणजे जनतेवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे असं सांगतानाच या मुद्यावर विरोधकांची एकजूट होऊन काही फरक पडणार नाही, असं ते म्हणाले. ईव्हीएमविरोधात आंदोलन करण्याऐवजी त्यांनी जनतेत जावं. आम्हाला कामं करता आली नाहीत, भविष्यात ती करू असं सांगितलं तरी जनतेकडून तुम्हाला सहानुभूती मिळेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

मात्र असं असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पक्षाचा इतिहासच माहित नसल्याचं स्पष्ट होतं आहे. कारण फडणवीसांनी जरी राज ठाकरे आणि विरोधकांना टोला लगावताना म्हटलं की, ‘विरोधकांनी ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करणे हे अविश्वास दर्शविण्यासारखे आहे, ते न करता आत्मचिंतन करावे’. मात्र मुख्यमंत्र्यांना हे माहीतच नाही की ईव्हीएमवर सर्वात पहिली शंका भारतीय जनता पक्षानेच घेतली होती. २००९ मधील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ईव्हीएम’मधील गैरप्रकारावरून खूप आगपाखड करत त्यावर बंदी आणत बॅलेट पेपरने निवडणुका घ्याव्या असा आग्रह धरला होता. स्वतः लालकृष्ण अडवाणी, रविशंकर प्रसाद आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी जाहीर कार्यक्रमात आणि पत्रकार परिषद आयोजित करून ईव्हीएम’मधील गैरप्रकार उघड करत, बॅलेट पेपरची मागणी केली होती.

दरम्यान आजच्या विरोधकांच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, ‘खरंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांनी यामध्ये सामील होणं अपेक्षित होतं’ आणि नेमका हाच धागा पकडून राज ठाकरे यांनी ही मागणी केली होती. त्यामुळे भाजप नेत्यांच्या ईव्हीएम’वरील शंकेने त्यांची देखील निवडणूक पद्धतीवर शंका होती असंच म्हणता येईल.

VIDEO: काय आरोप केले होते भाजपने ईव्हीएम’ला अनुसरून त्याचे पुरावे

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x