23 February 2025 12:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

मुख्यमंत्र्यांना संताजी-धनाजीसारखे सर्वत्र फडणवीसच दिसतात - प्रवीण दरेकर

BJP Pravin Darekar, CM Uddhav Thackeray, interview to Saamana Newspaper

मुंबई, २५ जुलै : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीमधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस यांच्यावर करण्यात आलेल्या या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा दौरा केल्यानंतर सरकारचे अपयश आणि निष्क्रियता चव्हाट्यावर आणली. त्यामुळे सरकारची असुया आता दिसत असल्याचं, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

ज्याप्रमाणे संताजी-धनाजी सारखे पाण्यात दिसायचे, त्याप्रमाणे सरकारी पक्षांना देवेंद्र फडणवीसांशिवाय कोणीच दिसत नाही, असा टोलाही दरेकर यांनी हाणला आहे. केंद्र सरकारने कोविडच्या परिस्थितीमध्ये काय मदत केली, याचा सविस्तर लेखा-जोखा देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचंही दरेकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यापेक्षा सरकारने कोरोनाचे नियोजन आणि त्याचं निर्मुलन करण्याकडे अधिक लक्ष आणि वेळ द्यावा, असा सल्लाही प्रविण दरेकर यांनी दिला आहे.

तत्पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. दिल्लीमध्ये जाऊन महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीसंदर्भातील माहिती वरिष्ठ नेत्यांना देणाऱ्या फडणवीस यांच्याकडून आपण सल्ला आणि सूचना मागवल्या होत्या असं मुख्यमंत्री म्हणाले होते. “त्यांनी त्यांचा जो महाराष्ट्राचा फंड आहे तो दिल्लीत दिल्ल्याने ते सगळ्या गोष्टी दिल्लीत जाऊन करतात,” असा टोलाही उद्धव यांनी फडणवीसांना लगावला होता. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची विशेष मुलाखत घेतली, याच मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी हे ठाकरे शैलीतील फटकारे लगावले होते.

मात्र, फडणवीस दिल्लीत जाऊन काय करताहेत याची मला चिंता नाही. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे तोवर मला चिंता नाही. बाकी फडणवीस हे बोलतच राहतील. कदाचित त्यांची पोटदुखी अशी असेलही की, कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली. हीसुद्धा पोटदुखी असू शकेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता.

 

News English Summary: Darekar also said that Devendra Fadnavis gave a detailed account of what the central government did to help Kovid’s situation. Instead of criticizing Devendra Fadnavis, the government should pay more attention and time to the planning and elimination of corona said Pravin Darekar.

News English Title: BJP Pravin Darekar reacts on Chief Minister Uddhav Thackeray interview to Saamana Newspaper News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x