महाराष्ट्रात शत-प्रतिशत भाजपासाठी कामाला लागण्याचे केंद्रातून आदेश
मुंबई, २७ जुलै : आज झालेल्या महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीवेळी उपस्थितांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी एकेकाळचे युतीमधील सहकारी असलेल्या उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आई भवानी उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य देवो अशी शुभकामना व्यक्त केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हे सरकार पाडण्यात स्वारस्य नाही. मात्र सत्ताधाऱ्यांनी हे सरकार किमान चालवून दाखवावे, तुम्ही एकमेकांचे हातपाय मोडायला सक्षम आहात. तसेचे हे काही जनतेने निवडून दिलेले सरकार नाही, तर धोक्याने सत्तेवर आलेले सरकार आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. तसेच सामनामधील मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे या सरकारचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंकडेच आहे. मात्र त्यामधून कुठे जायचं हे मात्र मागे बसलेले ठरवतात, अशी टीका केली.
दुसरीकडे महाराष्ट्रात आगामी काळात कोणाचीही मदत न घेता सरकार आणण्याच्या तयारीला लागा अशा सूचना भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिल्या आहेत. पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जे पी नड्डा यांनी संवाद साधला. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हजर होते. भाजपाने आपला विस्तार करण्यावर लक्ष दिलं पाहिजे असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
“पुढच्या वेळी एकट्याने महाराष्ट्र सांभाळण्याची आपली तयारी असली पाहिजे. याची तयारी आजपासूनच आपल्याला करायची आहे. कोणाचीही सोबत नाही, मदत नाही असा संकल्पच केला पाहिजे. एकटी भाजपा महाराष्ट्रात कमळ आणणार, प्रत्येक ठिकाणी कमळ असेल यासाठी कामाला लागा. पक्षाचा प्रत्येक उमेदवार जिंकेल यासाठी प्रयत्न करा,” असं जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे.
News English Summary: BJP president JP Nadda has instructed the people to get ready to form a government in Maharashtra without any help. He was speaking at a party executive meeting. JP Nadda interacted through video conferencing.
News English Title: BJP President JP Nadda Video Conference Chief Minister Uddhav Thackeray Maharashtra Government News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON