22 April 2025 7:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

साताऱ्यात लोटसचं ऑपरेशन होणार | भाजप आ. शिवेंद्रराजे यांची राष्ट्रवादीत घरवापसी होणार?

BJP, Satara, MLA Shivendra Raje Bhosale, NCP

सातारा, १९ फेब्रुवारी: भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना राष्ट्रवादीकडून ऑफर आल्याने राजकीय वातावरण बदलले आहे.“शशिकांत शिंदे आणि मी एकच आहे. त्यामुळे कुणाला कुणीकडेही जाऊ दे, मात्र गावांचा तालुक्याचा विकास करणे हा एकच आमचा उद्देश आहे. गरज असलेल्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत. त्यास प्राधान्य दिले जाईल,” असं विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं आहे.

शिवेंद्रराजे भोसले यांच्या या नव्या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, शिवेंद्रसिंहराजे यांची राष्ट्रवादीमध्ये घरवापसी होणार असल्याच्या चर्चेने साताऱ्यात सध्या जोर धरला आहे. शिवेंद्रसिंहराजे यांनी राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये येण्यासाठी यू-टर्न घेतल्याचीही चर्चा ही जिल्ह्यात आहे. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधीच शिवेंद्रराजे यांची राष्ट्रवादीत घरवापसी होणार, असं बोललं जात आहे.

जावळी तालुक्यातील राजकारणामुळे शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मध्ये जुगलबंदी होत वाद विकोपाला गेले होते .यानंतर शशिकांत शिंदे यांनी माझ्यामध्ये व शिवेंद्रसिंहराजेमध्ये कोणतेही वाद नाहीत. आम्ही आजही एकत्र काम करत असल्याचे म्हटले होते. सातारा जिल्हा बँकेची निवडणूक आम्ही सर्वांना घेऊन बिनविरोध करणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

सध्या शिवेंद्रसिंहराजे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. सातारा पालिकेची निवडणूक शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यास त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल, असेही शशिकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे. त्याच दिवशी रात्री जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व शिवेंद्रसिंहराजे यांच्यात सातारा विश्रामगृहात खलबते झाली होती.

 

News English Summary: Shivendra Raje Bhosale’s new statement has started a discussion in the political circles and the discussion that Shivendra Singh Raje will return home to the NCP is currently gaining momentum in Satara. There is also talk in the district that Shivendra Singh Raje has taken a U-turn to join the NCP. It is being said that Shivendra Raje will return home before the Satara District Bank elections.

News English Title: BJP Satara MLA Shivendra Raje Bhosale may join NCP news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या