13 January 2025 10:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीच्या बैठकीला एकनाथ खडसेंची दांडी

Eknath Khadse, BJP Core Committee at Jalgaon

जळगावः भारतीय जनता पक्षातील पक्षांतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर आज जळगावात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक होत आहे. निर्धारित वेळेपेक्षा तब्बल दोन तास उशिराने सुरू झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला भारतीय जनता पक्षाचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी अनुपस्थिती आहे.

दरम्यान, एकनाथ खडसेंनी या बैठकीला दांडी मारली की काय? अशी चर्चा सुरू आहे. एकनाथ खडसे हे विधानसभा निवडणुकांपासून पक्षातील नेतृत्वावर आपली नाराजी दर्शवत आहेत. मात्र, मी भारतीय जनता पक्षामध्येच आहे अन् राहीन असेही ते ठणकावून सांगत आहे. दोन दिवसांपूर्वीच एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंची भेट घेऊन ओबीसी नेत्यांच्या भेटीगाठीचं समर्थन केलंय. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही नाव न घेता लक्ष्य केलं आहे.

पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पक्षातील नेत्यांनीच पाडलं, असा आरोप एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्याला उत्तर देताना, भारतीय जनता पक्षाधील पाडापाडी करणाऱ्या नेत्यांची नावं जाहीर कराच, असं खुलं चॅलेंज गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिलं होतं. त्यामुळे खडसे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

BJP Senior Leader Eknath Khadse Absent in BJP’s North Maharashtra Core Committee Meeting at Jalgaon

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x