‘वंचित’कडून २८८ जागा लढण्यासाठी मोर्चेबांधणी; भाजप-सेना देखील स्वबळावर? सविस्तर

पुणे : महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांतच होणार असून, वंचित बहुजन आघाडीला निवडणूक लढविण्यासाठी निवडणूक आयोगाने कपबशी गायब करून गॅस सिलिंडर हे चिन्ह दिलं आहे. तसेच वंचित आघाडीकडूनही २८८ जागा लढविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र आता मतदारांंपर्यंत कपबशी ऐवजी गॅस सिलेंडर हे नवे चिन्ह पोहोचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
तर निवडणूक आयोगाने वंचितच पूर्व चिन्ह कपबशी हे आता आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला बहाल केले आहे. त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांना आता ‘सिलिंडर’ घरोघरी पोहोचविण्यासाठी पराकाष्ठा करावी लागेल. वंचितच्या सर्व उमेदवारांसाठी हे एकच चिन्ह असेल. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत वंचितने तब्बल ४१ लाख मते घेतली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास विधानसभा निवडणुकीत कसा टिकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
‘वंचित’ने २८८ जागा लढवण्याचा उद्देशाने राज्यभरात उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा सपाटा सुरू केला होता. मात्र, पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे ही प्रक्रिया मंदावली होती. विशेष विधानसभा निवडणुकीसाठी वंचितसोबत महाआघाडी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक असून, त्यासाठी नवा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ९६ जागा देण्याची ऑफर दिली आहे. परंतु हा प्रस्ताव अमान्य करून, काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यातील काही जागा इतरही पक्षांना वाढवून द्याव्यात, अशी मागणी अॅड प्रकाश आंबेडकर यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आघाडीसोबत जाण्यासाठी इच्छुक नसल्याचं स्पष्ट होतं आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर शिवसेनेला देखील बळ मिळाले आहे. अनेक विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना आघाडी मिळाली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचा विश्वास आहे. दुसरीकडे शिवसेनेने देखील स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा त्याचाच भाग होता का, असा प्रश्न उपस्थित होतो. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना प्रवेश देण्यात आला आहे. ज्या जागेवर भारतीय जनता पक्ष मजबूत नाही, तिथे प्रामुख्याने दिग्गज नेत्यांना भारतीय जनता पक्षाने पक्षात घेतले आहे. जेणे करून ऐनवेळी युती तुटली तरी या नेत्यांना मैदानात उतरून बहुमताकडे जाता येईल.
दरम्यान विरोधी पक्षात देखील आघाडी संदर्भात बोलणीच सुरू आहे. त्यात लोकसभा निवडणुकीपासून उभं राहिलेलं वंचित बहुजन आघाडीच्या आव्हानामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आघाडीकडून वंचितशी बोलणी करण्यात आली. परंतु, त्याला यश आले नाही. वंचित आघाडी स्वबळावर लढल्यास त्याचा फायदा भारतीय जनता पक्षालाच होणार आहे. किंबहुना भारतीय जनता पक्षाला स्वबळावर लढण्यासाठी बळच मिळेल. परंतु, वंचित बहुजन आघाडीत सामील झाल्यास भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला स्वबळाची तयारी करून देखील युती करावी लागणार अशी स्थिती राज्यात आहे.
दरम्यान, पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘रिपब्लिकन’ हा राजकीय विचार संपविण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकरांकडून होत आहे असं कवाडे म्हणाले आहेत. तसेच त्यांनी वंचित बहुजन आघाडीवरही जोरदार टीका केली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA