15 January 2025 4:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

ओबीसीं'ना सर्वाधिक संधी दिल्याचं सांगत पंकजा मुंडेंच्या मागण्या अमान्य करण्याची रणनीती

BJP Leader Pankala Munde, BJP MLA Girish Mahajan. BJP MLA Chandrakant Patil

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी १२ डिसेंबर रोजी मोठा राजकीय निर्णय घोषित करणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, त्यानंतर यावर भारतीय जनता पक्षातील केंद्रापासून ते राज्यातील नेते मंडळी हिदुत्वापेक्षा थेट ओबीसी’च्या मुद्यावर घसरल्याचे पाहायला मिळत आहे.

भारतीय जनता पक्षामध्ये ओबीसी समाजातील नेत्यांवर राज्यात अन्याय होत असल्याच्या उलटसुलट चर्चा सध्या सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर ओबीसी वर्गाला भारतीय जनता पक्षात आजिबात डावललं जात नसल्याचे भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी म्हटले. तसेच ओबीसी वर्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानिक अधिकार मिळवून दिला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे ओबीसींचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, अशा शब्दांत खासदार साबळे यांनी मोदींचे कौतुक केलं.

तसेच उत्तर महाराष्ट्रात स्वतःचा मतदारसंघ वगळता कोणतीही विशेष कामगिरी करू न शकलेले मोदी लाटेतील संकटमोचक गिरीश महाजन देखील राजकीय दृष्ट्या संकटात सापडल्याने अचानक त्याच्यातील ओबोसी नेता जो कधीही ओबीसींच्या मुद्यावरून रस्त्यावर उतरलेला राज्याने पाहिलेला नाही, तो देखील जागा झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याला कारण म्हणजे पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्यात वाढलेल्या भेटीगाठी.

राज्यात चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर भाजपाची सत्ता देखील गेली आणि पक्षात मोठं द्वंद्व पेटल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे तेदेखील पक्षात स्वतःची पत टिकवून ठेवण्यासाठी फडणवीस आणि महाजनांच्या लॉबीत दाखल झाले आहेत. पंकजा मुंडे यांचा प्रदेशाध्यक्ष मिळविण्यासाठी मोठा दबाव आहे, मात्र त्या प्रदेशाध्यक्ष झाल्या तर फडणवीस-महाजन-चंद्रकांत पाटील लॉबीला पक्षांतर्गत अडचणी येऊ शकतात. कारण तसं झाल तर मुंबई आणि राज्यातील तिकीट नाकारण्यात आलेले मोठे नेते देखील पंकजा मुंडेंच्या तंबूत दाखल होतील याची त्यांना भीती असल्याने, सध्या भाजपचे दुसऱ्या गोटातील नेते ओबीसींना सर्वाधिक प्रतिनिधी दिलं गेल्याच सांगत सध्या ‘नो वॅकन्सी’ असा अप्रत्यक्ष संदेश देत आहेत.

भारतीय जनता पक्षात सध्या प्रदेशाध्यक्षपदासाठी चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडे यांच्यात रस्सीखेच असल्याचं दिसत आहे आणि त्याच्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. मात्र, फडणवीसांना स्वतःच्या लॉबीतील नेता त्यापदावर हवा असल्याने भाजपात लवकरच मोठी राजकीय उलथापात होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात भाजपमध्ये सध्या प्रचंड खदखद सुरु आहे आणि त्यात एकनाथ खडसे यांनी थेट मी वेगळा विचार करू शकतो असा सज्जड इशाराच दिला आहे. भाजपात कोणतही मोठं पद न मिळाल्यास राष्ट्रवादी त्यांची बीड आणि परळीतील राजकीय शक्ती नगण्य करेल अशी शक्यता आहे. त्यातच राज्यात आलेली सत्ता गेल्याने भारतीय जनता पक्षातील अनेक वर्षांपासून नाराज असलेला गट अधिक आक्रमक झाला आहेत. राज्यात पक्षाला प्रदेशाध्यक्षपद फार महत्त्वाचं असतं. त्यातच आता सत्ता नसल्याने भारतीय जनता पक्षात प्रदेशाध्यक्षपदासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. या पदासाठी विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांनीही दावा केल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

त्यामुळे पंकजा मुंडे ओबीसी समाजाचा चेहरा असल्याने फडणवीसांच्या लोंबीतील नेते या समाजाला पुरेसं नैतृत्व यापूर्वीच दिल्याचं सांगून वेगळाच संदेश देताना दिसत आहेत. त्यात पंकजा मुंडे यांचं राजकीय वलय राज्यभर असलं तरी ते चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांबाबतीत असल्याचं दिसत नाही. त्यात मराठा आरक्षणाच्या मुद्याचा काहीच फायदा न झाल्याने पाटील सुद्धा बॅकफूटवर आहेत, मात्र अमित शहांशी कौटुंबिक जवळीक असल्याने त्यांना तारले आहे.

दरम्यान राज्यात मोठा पक्ष म्हणून कल मिळाल्यानंतर भाजप विरोधी पक्षात बसली आहे. यामुळे अनेक आमदारांचे हिरमोड झाला आहे. त्यातच अनेक नेत्यांकडून प्रदेशाध्यक्षपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु असल्याचेही पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपद नेमक कोणाकडे जाणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र ते प्रदेशाध्यक्ष पद किंवा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद ना मिळाल्यास पंकजा मुंडे यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आणल्यास राज्यात कधीची राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

BJP State Politics over OBC issue is Indication for Former Minister Pankaja Munde

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x