5 November 2024 4:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

राज ठाकरेंनी पक्षवाढीसाठी राज्यभर फिरलं पाहिजे | त्याने आपला जनाधार कळतो

BJP State President Chandrakant Patil, Raj Thackeray, Grampanchayat Election 2020

मुंबई, १६ डिसेंबर: महाराष्ट्रातील तब्बल १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १८ जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. Election Commission announces election program for 14 thousand 234 Gram Panchayat in Maharashtra.

दरम्यान, राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व ठिकाणी उमेदवार उभे करा, ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवा, असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व जिल्हाध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे मनसेही या निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मात्र राज्यातील ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांनी पक्षवाढीसाठी राज्यभर फिरलं पाहिजे. त्यामुळे आपली ताकद दिसून येते, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा सल्ला दिला. महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा किती परिणाम होऊ शकतो, हे सांगता येईल. पण ग्रामीण भागात ग्रामपंचाययत निवडणुकीत त्यांचा किती परिणाम होईल हे सांगू शकत नाही, असं सांगतानाच राज ठाकरे यांना माझी एक सूचना राहील. त्यांनी पक्षवाढीसाठी फिरलं पाहिजे. फिरल्याने आणि प्रत्येक निवडणूक लढवल्यामुळे आपल्याला किती जनाधार मिळतो हे कळतं, असं पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबरच्या युतीची शक्यता फेटाळून लावली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर आम्ही युती करणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात काल भाजपच्या आमदारांची बैठक झाली. त्यात निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. मतदारसंघातील अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यात आल्या. तसेच काही सूचनाही करण्यात आल्या आहेत. भारतीय जनता पक्ष ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे, असं पाटील म्हणाले.

 

News English Summary: Bharatiya Janata Party (BJP) state president Chandrakant Patil has given an important piece of advice to MNS president Raj Thackeray on the backdrop of Gram Panchayat and local body elections in the state. Raj Thackeray should travel all over the state for party growth. This shows our strength, said Chandrakant Patil.

News English Title: BJP State President Chandrakant Patil advice to Raj Thackeray over Grampanchayat Election 2020 news updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x