29 April 2025 3:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL
x

राज ठाकरे बरं बोलत नाहीत तर खरं बोलतात | १-२ दिवसात माझी त्यांच्याशी भेट होणार आहे - चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

मुंबई, ०२ ऑगस्ट | भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या युतीची चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मनसेच्या नेत्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली असताना देखील भाजपकडून विरुद्ध संकेत दिले जातं आहेत.

मनसे संदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “मेरे को क्लीप मिली. मैने सुनी, असं सांगतानाच मनसेसोबत युती करण्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागेल, असं मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत हे विधान केलं आहे. राज ठाकरे हे मला आवडणारं राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. ते बरं बोलत नाहीत तर खरं बोलतात. त्यांनी मला क्लिप पाठवली. ती मी ऐकली आहे. एकदोन दिवसात माझी राज ठाकरेंशी भेट होणार आहे. माझ्या मनातील प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार आहे, असं सांगतानाच या युतीमुळे देशाच्या राजकारणावर पडसाद उमटणार आहेत. त्यामुळे केंद्राची परवानगी घेणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

केंद्राची परवानगी घ्यावी लागेल:
मी ती क्लिप ऐकली आणि माझं म्हणणं मी त्यांच्यासमोर ठेवेन. मुझे तो आम से मतलब है. किससे मिली क्या मतलब? असं सूचक विधान करतानाच मेरे को क्लिप मिली. मैने सुनी. पण युतीबाबतचा मी एकटा निर्णय घेणार नाही. आमची पार्टी या संदर्भात निर्णय घेणार आहे. आता युती ऑन दी स्पॉट होणार नाही. त्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागेल, असं ते म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP state president Chandrakant Patil again made statement on alliance with MNS news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या