17 April 2025 4:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

पक्षाने किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत | आमच्याकडून त्यांच्याबद्दल अपशब्द निघणार नाही - चंद्रकांत पाटील

Maratha reservation

कोल्हापूर, २७ मे | खासदार छत्रपती संभाजीराजे भाेसले १८ व १९ मे राेजी नाशिक दाैऱ्यावर येऊन गेल्यानंतर पाठाेपाठ अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हेदेखील मंगळवारी (दि. २५) नाशिक दाैऱ्यावर येऊन गेले. त्यानंतर पुन्हा संभाजीराजेंनी नाशिकमध्ये तळ ठाेकून विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या गुप्त बैठका घेत चर्चा केली. आज गुरुवारी (दि. २७) ते आरक्षणासंदर्भात मराठा क्रांती माेर्चाच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करणार आहेत. मराठा आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी शांतता व संयम राखण्याचे आवाहन मराठा समाजाला केले होते.

चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया:
मात्र भाजपने आता थेट संभाजीराजे छत्रपती यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करण्यास सुरुवात केली आहे. स्वतः चंद्रकांत पाटील यांनी याबाबत वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारतीय जनता पक्षानं एक पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. केला गेलेला सन्मान हा बहुदा इतरांना माहित नाही असही पाटील म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार चार वेळेस पत्र लिहून भेट मागितली पण संभाजी छत्रपतींना मोदींनी भेट दिलेली नाही. त्यावर खुद्द संभाजी छत्रपतींनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. विरोधकांनी याच नाराजीचा फायदा उठवत भारतीय जनता पक्षावर टीका सोडलीय. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात हे वक्तव्य केलं आहे.

सध्या संभाजी छत्रपती हे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात ठिकठिकाणी भेटीगाठी करतायत. त्यात एक वेळेस त्यांनी आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी खासदारकीही सोडायला तयार असल्याचं म्हणाले. विशेष म्हणजे खा. संभाजी छत्रपतींना भाजपनं राज्यसभेवर पाठवलेलं आहे. संभाजी छत्रपतींचं खासदारकी सोडण्याचं वक्तव्य भाजपविरोधी म्हणून पाहिलं जातं आहे. तेव्हापासूनच भाजप आणि संभाजी छत्रपती यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरु झालीय. एवढच नाही तर संभाजी छत्रपती हे मोदीविरोधी भूमिका घेतायत का? अशी चर्चाही सध्या होती आहे. चंद्रकांत पाटील यांनीही संभाजीराजे व्यक्ती म्हणून काय करतात त्याचं त्यांना स्वातंत्र्य असल्याचं म्हणाले. आमच्याकडून त्यांच्याबद्दल अपशब्द निघणार नाही एवढच नाही तर नेतृत्व करणाऱ्यासोबत पक्ष झेंडा बाजुला ठेऊन आम्ही सहभागी होणार असही पाटलांनी सांगितलं

पवारांच्या भेटीनंतर संभाजीराजे काय म्हणाले?
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, “गेले तीन-चार दिवस मी महाराष्ट्राचा दौरा केला. मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दु:खी आहे, हे शरद पवारांना सांगितलं. एकंदरीत मराठा समाजाची खदखद, त्यांची परिस्थिती पवारांच्या कानावर घातली. या प्रश्नी तुम्ही पुढाकार घेण्याची गरज असल्याचं त्यांना सांगितलं. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, नारायण राणे या सगळ्यांनी एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घ्यायला हवी. त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि सकारात्मक दृष्टीकोन दाखवला. उद्या या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होणार आहे. तर संध्याकाळी मुंबई पत्रकार परिषद घेणार आहे.

 

News English Summary: Chandrakant Patil’s statement about this has raised eyebrows of many. He has said that Sambhaji Raje does not say how much respect the Bharatiya Janata Party has given as a party. Patil also said that the honor bestowed on him is probably not known to others

News English Title: BJP state president Chandrakant Patil statement over Sambhajiraje Chhatrapati meeting on Maratha Reservation issue news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या