10 January 2025 4:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: BHEL Penny Stocks | कुबेर कृपा करणारा 75 पैशाचा पेनी शेअर, यापूर्वी 1775 टक्के परतावं दिला - Penny Stocks 2025 Bank Account Alert | 'या' बँक FD वर देतात घसघशीत परतावा; 9 टक्क्यांपर्यंत मिळेल व्याज, पैशाने पैसा वाढवा Itel Zeno 10 | इंटेल Zeno 10 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ 5999 रुपये, स्मार्टफोन मध्ये AI लेन्सचा देखील समावेश Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर ICICI सिक्युरिटीज फर्म बुलिश, पुढची टार्गेट नोट प्राईस करा - NSE: TATAPOWER
x

संभाजी छत्रपतींची सरकारला सहकार्य करण्याची कृती मान्य नाही - चंद्रकांत पाटलांचा इशारा

Maratha reservation

कोल्हापूर, ३० मे | मराठा आरक्षणाच्या विषयावरून संभाजीराजे छत्रपती राज्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी जवळपास सर्वच राजकीय पक्षातील महत्वाच्या नेत्यांची भेट घेऊन समर्थनासाठी विनंती केली आहे. त्यांच्या भेटीगाठीवरून सर्वच पक्षांनी सहकार्याची भूमिका घेतलेली असताना भारतीय जनता पक्षाच्या पोटात दुखू लागल्याचं पाहायला मिळतंय.

मराठा आरक्षण मिळवण्यासाठी कोणता मार्ग हाताळायचा यावरून भारतीय जनता पक्षाचे खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे. संघर्ष न करता सरकारला सहकार्य करण्याची संभाजी छत्रपती यांची भूमिका आम्हाला अमान्य आहे, असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पाटील यांच्या या भूमिकेमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात असून या मुद्दयावरून भारतीय जनता पक्षामध्ये संभाजी छत्रपती एकाकी पडल्याचं चित्रंही निर्माण झालं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मराठा आरक्षणाबाबतची भारतीय जनता पक्षाची भूमिका नेमक्या शब्दात स्पष्ट केली. मराठा आरक्षण लगेच मिळावं, मराठा समाजाला सवलती मिळाव्यात यासाठी जो जो व्यक्ती संघर्ष करेल. त्याच्याबरोबर आम्ही आहोत. हे आम्ही दहावेळा सांगितलं आहे. संभाजीराजे हे आमचे राजे आहेत. राजेंनी आरक्षण मिळालं पाहिजे, पण संघर्ष न करता मिळालं पाहिजे, असं स्पष्ट केलं आहे. आरक्षणासाठी संघर्ष करायचा की नाही हे कोविड संपल्यावर बघू असं त्यांनी सांगितलं आहे. हे आम्हाला मान्य नाही. संभाजीराजेंच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. पण त्यांची कृती सरकारला सहकार्य करण्याची असेल आणि कोविडमुळे शांत बसण्याची त्यांची भूमिका असेल तर आम्हाला ती मान्य नाही. त्यांची कृती सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण घेण्याची असेल तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत आहोत, असं पाटील यांनी स्पष्ट केलं

 

News English Summary: BJP MP Sambhaji Chhatrapati and BJP are at loggerheads over which route to take to get Maratha reservation. We have rejected the role of Sambhaji Chhatrapati in cooperating with the government without any struggle, explained BJP state president Chandrakant Patil.

News English Title: BJP state president Chandrakant Patil take a dig at Sambhajiraje Chhatrapati over Maratha Reservation news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x