2 January 2025 7:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी BUY रेटिंग, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Waaree Energies Share Price | वारी एनर्जीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: WAAREEENER Wipro Share Price | आयटी विप्रो शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, 33 टक्के परतावा मिळेल - NSE: WIPRO Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | या पेनी शेअर्स गुंतवणूदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, 17 जानेवारी पूर्वी फायदा घ्या - BOM: 539519 Penny Stocks | 2 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला गर्दी, श्रीमंत करणार हा शेअर, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2025 Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर रॉकेट होणार - NSE: ASHOKLEY
x

चंद्रकांत पाटील यांच्याकडून अनिल परब आणि नार्वेकरांचं नाव घेत अप्रत्यक्षरीत्या अटकेची धमकी?... काय म्हणाले?

Chandrakant Patil

नाशिक, १७ जुलै | कुणाला अटक झाली तर प्रतिक्रिया द्यायला मी नाशिकमध्येच आहे, असं विधान करून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अप्रत्यक्षरीत्या धमक्या देण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. आता चंद्रकांतदादांनी मागील काही दिवसांपासून अशी विधान करत सत्ताधाऱ्यांना धमक्या देण्याचा सपाटा लावल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना नेते अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यांची चौकशी सुरू आहे, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र त्याही पलीकडील विधान त्यांनी केलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. रात्रीतून कुणाला अटक झाली तर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी मी नाशिकमध्ये उपलब्ध आहे, असं म्हटलं होतं. मी कुणाचेही नाव घेतलं नव्हतं. खूप जणांच्या चौकश्या सुरू आहेत. त्यातील अनेकांची अटक होण्याची शक्यता आहे. माझा नेमका रोख कुणाकडे नव्हता. तुम्हाला सोप जावं म्हणून नावांची यादी देत आहे. कुणालाही उघडं पाडायचं नाही. कुणाकडे रोख नाही. केवळ माहिती देत आहे.

अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्यासाठी काल कोणी तरी कोर्टात गेलंय. नितीन राऊत यांनाही कोर्टाने फटाकरलं आहे. संजय राठोड यांचाही एक मॅटर पेंडिग आहे. अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याचीही चौकशी सुरू आहे. केवळ तुम्हाला सोपं पडावं म्हणून आताच नावं घेतली आहेत, असं पाटील म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP state president Chandrakant Patil talked on Minister Anil Parab and Milind Narvekar news updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x