17 April 2025 4:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

पुणे-मुंबई महापालिकांच्या निवडणुकीआधी भाजपची राजकीय घाई? | अजितदादा, अनिल परबांच्या CBI चौकशीची मागणी

Mahavikas Aghadi

मुंबई, ३० जून | राज्यातील महत्वाच्या मुंबई आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्याने मुंबईत शिवसेना आणि पुण्यात राष्ट्रवादी मोठी मजल मारण्याची शक्यता आहे. त्यात राज्यात अनेक महानगरपालिकेत आणि नगरपालिकेत भाजपाची सत्ता हातातून जातं असल्याने चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांच्या नेतृत्वाची चिंता वाढली आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेत शिवसेना सोबत नसेल तर पुण्यात मोदी लाटेत आलेली सत्ता आता टिकवणं कठीण असल्याचं दिसतंय. परिणामी नेत्यांच्या बदनामीकडून पक्षाला बदनाम करण्याची व्यूहरचना आखली जातं आहे. मुंबई आणि पुणे महानगरपालिकेत पराभव झाल्यास चंद्रकांत पाटील यांची गच्छंती होईल अशी शक्यता असल्याने ते देखील चिंतेत असल्याचं भाजपच्या गोटातून समजलं. त्यामुळे ते सर्वाधिक पुढे असल्याचं वृत्त आहे.

त्यासाठी भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची CBI चौकशी करावी, अशी मागणी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. भाजपने नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी बैठकीमध्ये याबाबतचा ठराव संमत केला होता. त्याप्रमाणे आता भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसं निवेदन पाठवले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधात सचिन वाझे याच्या पत्रात वसुलीचे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे त्यांची सीबीआयतर्फे सखोल चौकशी करा, असं चंद्रकांत पाटील यांनी निवेदनात म्हटलं आहे. प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या एक कोटी दहा लाख सदस्यांतर्फे आपण ही मागणी करत असल्याचा चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्षांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवल्यानंतर अमित शाह कोणता निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP State president Chandrakant Patil writes letter to Amit Shah demands CBI probe against Ajit Pawar and Anil Parab news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या