22 January 2025 7:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC
x

2024च्या विधानसभा निवडणुकीत आमचं एकच इंजिन असेल - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

पुणे, ०७ ऑगस्ट | भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे मनसे-भाजप युती होण्याच्या चर्चेने जोर धरलेला असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत आमचं एकच इंजिन असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पाटील-राज यांची भेट निष्फळ ठरलीय का? असा सवाल केला जात आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पुण्यात आहेत. त्यांनी पुण्यातील मेट्रो कामाची पाहणी केली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं. मनसे आणि भाजप एकत्र येणार आहे का? असा सवाल फडणवीसांना करण्यात आला. त्यावर 2024मध्ये भाजपचं एकच इंजिन असेल एवढं ध्यानात ठेवा, असं फडणवीस म्हणाले. त्यामुळे मनसे-भाजप युती होणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

यावेळी फडणवीस यांनी दिल्लीत जाणार असल्याचंही सांगितलं. दिल्लीत भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी चंद्रकांत पाटील दिल्लीत गेले आहेत. तर पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार हे भाजप नेते सोमवारी दिल्लीत जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या या दिल्लीवारीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP will contest Maharashtra Assembly Election 2024 independently said Devendra Fadnavis before moving to Delhi news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x