22 April 2025 3:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

शिक्षक-पदवीधर निवडणुकीत भाजप सर्व जागा जिंकणार या भविष्यवाणीनंतर अजून एक भविष्यवाणी

BJP, 400 seats, 2024 loksabha election, Chandrakant Patil

कणकवली, ७ जानेवारी: केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी कायद्यांना समर्थन देण्यासाठी भाजपाने आज कणकवलीमध्ये ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये आमदार नितेश राणे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. या रॅलीनंतर झालेल्या सभेला संबोधित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. हे निर्णय पाहता २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ४०० हून अधिक जागा मिळतील. तर काँग्रेसचे बसमध्ये बसवून नेता येतील एवढेच खासदार निवडून येतील, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

तत्पूर्वी राज्यातील अत्यंत महत्वाच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वांच्या सर्व जागा जिकेलं अशी गर्जना केली होती. मात्र प्रत्यक्ष निकालात भारतीय जनता पक्षाचा ऐतिहासिक पराभव झाला होता, ज्यामध्ये स्वतः नैतृत्व करत असलेल्या पुण्यात आणि फडणवीस नैतृत्व करत असलेल्या नागपुरात देखील भाजपचा दारुण पराभव झाला होता.

विधान परिषदेच्या 6 जागाही आम्ही जिंकू आणि पुणे तर वनवेच’, असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा पराभव मोठा धक्का मानला गेला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अजून एक देशपातळीवरील भविष्यवाणी केली आहे.

 

News English Summary: Chandrakant Patil said that the Modi government at the Center has taken many decisions in the interest of the people. In view of this decision, the Bharatiya Janata Party will get more than 400 seats in the Lok Sabha elections to be held in 2024. Chandrakant Patil also said that only Congress MPs can be elected by sitting in a bus.

News English Title: BJP will get more than 400 seats in 2024 loksabha election said Chandrakant Patil news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या