15 November 2024 3:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL
x

पवारांच्या राम जन्मभूमी उद्घाटनासंदर्भातील वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपकडून आंदोलन

BJP postcards, silver oak, Sharad Pawar

परळी, २२ जुलै : अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, देशात सध्या राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला होता.

पवार म्हणाले होते, “कोरोना हे देशावरचे मोठे संकट आहे. त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार एकत्रित आले पाहिजे. एकमेकांशी योग्य समन्वय साधून काम झाले पाहिजे. कोरोनाचे भयसंकट परतवून लावण्यासाठी कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे, हे प्राधान्याने ठरविले पाहिजे. परंतू, मंदिर बांधून कोरोनाचं संकट दूर होईल, असं काही मंडळींना वाटतं आहे. राम मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा. फक्त करोनाचं संकट दूर व्हावं हीच आमची इच्छा आहे.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राम जन्मभूमीचे उद्घाटनासंदर्भात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. बीड येथेही आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. ‘जय श्री राम’ असं लिहिलेले सुमारे 50 हजार पोस्टकार्ड शरद पवार यांचा मुंबईतील बंगला ‘सिल्व्हर ओक’वर पाठवण्यात येणार आहेत.

परळी येथे बुधवारी शरद पवार यांच्याविरुद्ध अनोखं आंदोलन करण्यात आलं. यावेळी शरद पवार यांच्या वक्तव्याचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी परळीत पोस्ट ऑफिससमोर निदर्शने करत ‘जय श्री राम’ नावाचे 5 हजार पोस्ट कार्ड पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर पाठवण्यात आले.

त्याचबरोबर बीड जिल्ह्यासह संबंध भारतातून शरदचंद्र पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर 50 हजार पोस्ट कार्ड पाठवण्यात येणार आहेत, असं भाजप युवक जिल्हा अध्यक्ष अरुण पाठक, शाम गित्ते यांनी सांगितलं आहे. प्रभू श्रीराम यांच्याबाबत बोलून शरद पवारांनी समाजात तेढ निर्माण करू नये, असंही अरूण पाठक यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: An agitation is being organized across the country on behalf of the Bharatiya Janata Party (BJP) to protest against the statement made by NCP National President Sharad Pawar regarding the inauguration of Ram Janmabhoomi. An agitation has also been started in Beed.

News English Title: BJP will send 50000 postcards on silver oak against Sharad Pawar News Latest Updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x