22 November 2024 1:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

प. बंगाल निवडणुकीनंतर आत्मविश्वास वाढला? | भाजप 400 पेक्षा अधिक जागा जिंकणारच - चंद्रकांत पाटील

Loksabha Election 2024

पुणे, १४ जुलै | निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या आधी त्यांनी काही वेळा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यामुळे देशात पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे. 2024 मध्ये कुणाच्याही नेतृत्वात निवडणूक लढवा. भाजप 400 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला आहे. चंद्रकांत पाटील आज (14 जुलै) कोल्हापुरात आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना दोन्ही काँग्रेसवर टीका केली. 2024मध्ये कुणाच्याही नेतृत्वात निवडणूक लढवा. भाजप 400 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

सरकारचे नाटक चालू आहे:
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही टीका केली. एकाने मारायचं आणि दुसऱ्यानं समजवायचं असा खेळ सध्या राज्य सरकारमध्ये सुरू आहे. हा खेळ न कळण्या इतपत महाराष्ट्रातील जनता मूर्ख नाही. त्याची शिक्षा या सरकारला निवडणुकीत मिळेलच. सरकारचे नाटक चालू आहे. त्याला लोकं विटली आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

तत्पूर्वी म्हणजे फेब्रुवारीत चंद्रकांतदादा म्हणाले होते की, “2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचं सरकार आलं. त्यावेळी भारतीय जनता पक्षाला 17 कोटी मतं मिळाली होती. त्या निवडणुकीत भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत भाजपला 22 कोटी मतं तर 303 जागा मिळाल्या. आता 2024 च्या निवडटणुकीत भाजपला देशात 30 कोटी मतं पाहिजेत आणि जागा 400 च्या पुढे जिंकायच्या आहेत, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP will win more than 400 seats in Loksabha Election 2024 said BJP Leader Chandrakant Patil news updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x