22 January 2025 6:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

भाजपचे ७ आमदार अजित पवारांच्या संपर्कात तर २ अपक्ष आमदार सेनेच्या संपर्कात

BJP, NCP, MLA

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या गोटात गेलेले २ अपक्ष आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहे. दरम्यान, या २ आमदारांची नावे समजू शकलेली नाहीत. परंतु, त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट मागितली आहे. सध्याच्या राजकीय हालचाली बघता उद्धव यांना वेळ नाही. त्यामुळे त्या २ अपक्ष आमदारांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.

शिवसेनेला ८ अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. आता आणखी २ अपक्ष आमदार शिवसेनेसोबत येण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांची संख्या वाढण्यात मदत होणार आहे. भारतीय जनता पक्षाला या २ अपक्ष आमदारांनी आधी पाठिंबा दिला होता. परंतु, भारतीय जनता पक्षाला समर्थन देणारे हे आमदार शिवसेनेसोबत येणास तयार झाले आहेत.

दुसरीकडे, सत्तास्थापनेस असमर्थ ठरल्यानंतर भारतीय जनता पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण भारतीय जनता पक्षाच्या ७ आमदारांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले हे आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

अजित पवारांना फोन करणारे सातपैकी २ आमदार सातारा जिल्ह्यातील तर एक आमदार पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. गरज पडल्यास आम्ही राजीनामा देऊ, असं या आमदारांनी अजित पवारांना सांगितल्याचं कळतंय. या आमदारांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यास भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधित १०५ जागांवर विजय मिळाला होता. मात्र महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरून आग्रही भूमिका घेतल्याने भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. दरम्यान, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी महाशिवआघाडी आकार घेईल, हे जवळपास निश्चित झाले आहे. आता तर सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाधील तब्बल ७ आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे वृत्त आले आहे. या आमदारांनी अजित पवार यांना स्वतः फोन केल्याचे वृत्त प्रसार माध्यमाच्या हाती आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x