17 April 2025 10:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA
x

सुजय विखे पाटील यांनी रेमडेसिव्हीर कशी आणली माहिती सादर करा, कोर्टाचे आदेश | CCTV फुटेजहि मागवले

BJP MP Sujay Vikhe Patil

मुंबई, ३० एप्रिल | रेमडेसिव्हीरचे 300 इंजेक्शन थेट दिल्लीहून मागवल्यामुळे भाजप खासदार सुजय विखे यांच्या अडचण्याची शक्यता आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी शिर्डी विमानतळ येथे उतरवण्यात आलेल्या खासगी विमानाची माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. ही माहिती गृह विभागाचे मुख्य सचिव सादर करतील. दिल्लीवरुन रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणल्याप्रकरणी सुजय विखे पाटील यांच्याविरोधात औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. अरुण कडू आणि इतर तीन जणांनी ही याचिका दाखल केली आहे. याच याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने वरील आदेश दिले. या प्रकरणावर पुढील सुनावणी 3 मे रोजी होईल.

सुजय विखे यांनी दिल्लीहून रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आज (29 एप्रिल) सुनावणी घेण्यात आली. सुनावणीदरम्यान 10 एप्रिल 2021 ते 25 एप्रिल 2021 या काळात शिर्डी विमानतळ येथे आलेल्या एका खासगी विमानाची माहिती सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले. तसेच विमानतळ आणि परिसरातील CCTV TV फुटेजसुद्धा सादर करावेत असे राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव यांना कोर्टाने सांगितले.

यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकील प्रज्ञा तळेकर यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. त्यांनी सुजय विखे यांनी प्रसारित केलेल्या व्हिडीओ क्लिप न्यायालयात सादर केल्या.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून गंभीर प्रकृती असलेल्या कोरोना रुग्णांसाठी रामबाण औषध ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रायगडमध्ये या इंजेक्शनच्या वापरामुळे अनेक रुग्णांवर दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने रायगड जिल्ह्यात तात्काळ रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

 

News English Summary: BJP MP Sujay Vikhe is likely to face difficulties as he has ordered 300 injections of Remedesivir directly from Delhi. The Aurangabad bench of the high court has directed to submit the details of the private plane that landed at Shirdi airport for remedial injection.

News English Title: Bombay High Court directs police to trace out remdesivir boxes unloaded by BJP MP Sujay Vikhe Patil news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या