18 January 2025 4:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार? संपूर्ण आकडेवारी पहा
x

दाऊदला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा | रोहित पवारांची मोदींकडे मागणी

Underworld Don, Dawood Ibrahim, NCP MLA Rohit Pawar

पुणे, २३ ऑगस्ट : कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे त्याला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा, अशी विनंती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करुन ही मागणी केली आहे.

“दाऊद इब्राहीम कराचीत असल्याचं पाकिस्तानं कबूल केलं आहे. त्याला भारतात आणण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करा, अशी मी पतंप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो. दाऊदला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणा”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

दाऊद इब्राहिम कराचीतच असल्याचं पाकिस्तानने आता कबूल केलं आहे. त्यामुळे दाऊदला भारतात आणा. कोणत्याही परिस्थितीत आणा, अशी मागणी रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. दरम्यान, पाकिस्तानने पहिल्यांदाच दाऊद पाकिस्तानात असल्याची कबुली दिली आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादाला रसद पुरवणाऱ्यांवर देखरेख ठेवणाऱ्या ‘फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स’ या संस्थेच्या ग्रे लिस्टमधून बाहेर येण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे. पाकिस्तानने ८८ दहशतवादी संघटनांवर, व्यक्तींवर बंदी, निर्बंध घातले आहेत. त्याबाबतची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत दाऊद इब्राहिमचा पत्ता देण्यात आला आहे. दाऊद इब्राहिमचा पत्ता हा ‘व्हाइट हाउस, सौदी मशीदजवळ, क्लिफ्टन, कराची’ असा देण्यात आला आहे. मागील अनेक वर्षांपासून दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात असल्याचा दावा भारताकडून करण्यात येतो. मात्र, पाकिस्तानने हा दावा फेटाळून लावला होता. आता मात्र, ‘फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स’च्या कार्यवाहीमुळे पाकिस्तानचे पितळ उघडे पडले आहे.

 

News English Summary: Notorious terrorist Dawood Ibrahim is currently in Karachi, Pakistan. Therefore, bring him to India under any circumstances, has been requested by NCP MLA Rohit Pawar. Rohit Pawar has made this demand by tagging Prime Minister Narendra Modi on Twitter.

News English Title: Bring underworld Don Dawood Ibrahim back said NCP MLA Rohit Pawar News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x