15 January 2025 4:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

CAA आंदोलनं: देश किंवा राज्य सोडावं लागेल ही भीती बाळगू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray, CAA Protest

नागपूर: नागरिकत्त्व सुधारणा कायद्यावरून देशभरात आगडोंब उसळला आहे. महाराष्ट्रातही याचे लोण पसरले असून ठिकठिकाणी आंदोलनं होतं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे. तसंच, महाराष्ट्रातील जनतेचे हक्क कुणालाही हिरवून देणार नाही, अशी ग्वाहीही दिली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलं.

सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल अनेकांच्या मनात भीती आहे. या कायद्याबद्दल अनेक गैरसमजदेखील आहेत. त्यामुळे देशातच गैरसमजाची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात राज्यासह देशभरात कित्येकजण रस्त्यावर उतरले आहेत. काही भागांमध्ये हिंसाचाराच्या घटनादेखील घडल्या आहेत. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागेल, अशी कोणतीही कृती नागरिकांनी करू नये, असंआवाहन मी जनतेला करतो, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. कायदा लागू झाल्यास आपल्याला देश सोडावा लागेल, अशी भीती काहींना वाटते. मात्र कोणीही चिंता करू नये. राज्य सरकार जनतेच्या हितांचं आणि हक्कांचं संरक्षण करण्यास समर्थ आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली.

सुधारित नागरिकत्त्व कायद्याविरोधात सलग दुसऱ्या दिवशीही देशभरात आंदोलनं सुरु आहेत. महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटले आहेत. परभणीमध्ये बंद आणि मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परभणी, पूर्णा, पालम, मानवत ही चारही शहरं कडकडीत बंद ठेवण्यात आली. दुपारी दोन वाजता इदगाह मैदानावरुन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाही काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x