19 April 2025 4:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML
x

परमबीर सिंग आणि सचिन वाझेच वसुली गॅंग चालवत होते का? | प्रसिद्ध कार डिझायनर छाबरियांचाही आरोप

Dilip Chhabria

मुंबई, ३१ मे |  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सिंग यांच्या इशाऱ्यावरुनच निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे खंडणी वसुली करत होता, असा गंभीर आरोप कार डिझायनर दिलीप छाबरिया यांनी केला आहे. परमबीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन वाझे, रियाझ काझी खंडणी वसुलीचे रॅकेट चालवत असल्याचा दावाही छाबरिया यांनी केला आहे. चार महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यानंतर छाबरिया सध्या जामिनावर बाहेर आहेत.

दिलीप छाबरियांचा आरोप काय आहे?
“माझ्या डीसीपीडीएल कंपनीत 52 टक्के शेअर्स असलेल्या किरण कुमार, इंदरमल रामाणी, सीआययू युनिटच्या पोलीस अधिकाऱ्यांनी परमबीरसिंग यांच्या इशाऱ्यावरुन माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून खंडणी वसुली करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप कार डिझायनर दिलीप छाबरिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केला आहे. 25 कोटी रुपयांची खंडणी द्या, अन्यथा 15 हून अधिक गुन्ह्यांना सामोरे जा, असं धमकावल्याचा दावाही छाबरियांनी केला आहे.

परमबीरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन वाझे, रियाझ काझी खंडणी वसुलीचे रॅकेट चालवत असून सीआययू युनिटच्या अंतर्गत तपास येत असलेल्या सर्व प्रकरणांची पुन्हा चौकशी करण्याची मागणी छाबरिया यांनी केली आहे. मुकेश अंबानी अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझे आणि रियाझ काझी या दोघांचं पोलिस खात्यातून निलंबन करण्यात आलं आहे.

 

News English Summary: Former Mumbai Police Commissioner Parambir Singh’s troubles are likely to escalate further. Car designer Dilip Chhabria has made a serious allegation that suspended police inspector Sachin Vaze was collecting ransom at Singh’s behest.

News English Title: Car Designer Dilip Chhabria writes to Chief Minister Uddhav Thackeray claims Param Bir Singh Sachin Vaze framed him news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या