22 December 2024 1:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा
x

अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करण्यापूर्वीच सीबीआयची धावाधाव | CBI आज मुंबईत

CBI, Anil Deshmukh, Parambir Singh

मुंबई, ६ एप्रिल: मुंबईतील बार, हुक्का पार्लर चालकांकडून दरमहा १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याच्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या आरोपांप्रकरणी अखेर अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी गृहमंत्र्यांवरील आरोपांची चाैकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिल्यानंतर देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा मंजूर केला.

दरम्यान, अनिल देशमुख यांनी सोमवारी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर तातडीने दिल्ली गाठली. याठिकाणी त्यांनी काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेतली. अनिल देशमुख हे सिंघवी यांच्या घरी गेले होते. याठिकाणी अनिल देशमुख, अभिषेक मनु सिंघवी आणि वकिलांच्या एका टीममध्ये साधारण तासभर चर्चा सुरु होती. त्यामुळे अनिल देशमुख सीबीआय चौकशीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार, असल्याचे सांगितले जाते.

मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या पत्रासंदर्भात चौकशीचे आदेश दिल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. न्यायालयाने सीबीआयला अहवाल सादर करण्यासाठी 15 दिवसांचीच मुदत दिली आहे. त्यामुळे सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे पथक आजच मुंबईत दाखल होईल.

 

News English Summary: CBI team to reach Mumbai on Tuesday to start process of registering preliminary enquiry against ex-Maha minister Anil Deshmukh.

News English Title: CBI team to reach Mumbai on Tuesday to start process of registering preliminary enquiry against Anil Deshmukh news updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x