5 November 2024 7:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

राज्यात पूल टेस्टिंग व प्लाझ्मा थेरपीला केंद्राची मान्यता

Pool Testing, Plasma Therapy, Rajesh Tope

मुंबई, २४ एप्रिल: करोना उपचारासाठी महाराष्ट्रात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून आज मान्यता मिळाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपी आणि पूल टेस्टिंग यांना संमती मिळाली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे दिली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सगळ्या राज्यांचे आरोग्यमंत्री उपस्थित होते. त्याच व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपी आणि पूल टेस्टिंगला केंद्राने मान्यता दिली आहे.

दरम्यान, देशभरात गुरुवारपासून आजपर्यंत ४९१ जण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. बरे होणाऱ्यांची संख्या आता ४७४८ झाली आहे. भारताचा रिकव्हरी रेट हा २०.५७ टक्के इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. मागील २८ दिवसांत ज्या जिल्ह्यात एकही कोरोनाचे प्रकरण समोर आले नाही, त्यात आणखी १५ जिल्ह्यांची भर पडल्याचेही त्यांनी सांगितले.

 

News English Summary: Maharashtra Plasma Therapy and Pool Testing have been approved, Health Minister Rajesh Tope said in a tweet. Union Health Minister Dr. Health ministers from all the states were present in the video conferencing held by Harshvardhan. In the same video conference, the Center has approved plasma therapy and pool testing in Maharashtra.

News English Title: Central Government Gave Permission For Pool Testing And Plasma Therapy In Maharashtra Says Health Minister Rajesh Tope.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x