5 January 2025 11:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | पगारदारांनो, या 5 स्टेप्स फॉलो करा, तुमचा सिबिल स्कोर कधीही खराब होणार नाही, जाणून घ्या फायद्याची बातमी Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या Sarkari Yojana | सरकार देईल कर्ज, स्वतःचा स्टार्टअप सुरू करा, 'या' योजना देतात झटपट लोन, जाणून घ्या सविस्तर SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा OnePlus 13 | वनप्लस 13 स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि प्राईस डिटेल्स जाणून घ्या Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, जबरदस्त फंड, रु.9000 एसआयपी वर मिळेल 35 लाखांहून अधिक परतावा
x

चंद्रकांतदादांना खरंच राजकीय ज्ञान आहे? | युवा वॉरियर्सला खोटी माहिती देत राजकीय करियर मार्गदर्शन

Chandrakant Patil, Narendra Modi, Dr AJP Abdul Kalam

पुणे, २० फेब्रुवारी: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरून विधानसभा मतदारासंघाचे आमदार चंद्रकांत पाटील पुन्हा एका नव्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. नरेंद्र मोदी यांनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, असं अजब विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तरुणाईला जोडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या युवा वॉरियर्स अभियानाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात झाला. त्यावेळी ते बोलत होते. याचवेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनीच अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, असं वक्तव्य त्यांनी केलं.

यावेळी आमदार भीमराव तापकीर, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. “नरेंद्र मोदी यांनी सर्व मुसलमानांना स्थान दिले असून, अब्दुल कलाम यांना देखील राष्ट्रपती त्यांनी केल आहे. त्यांना राष्ट्रपती मुस्लिम म्हणून केल नव्हते, तर एक कर्तृत्ववान, संशोधक म्हणून त्यांना केलं होतं,” असं पाटील यांनी म्हटलं आहे. पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओही फिरत असून, त्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

वस्तुस्थिती काय?
एपीजे अब्दुल कलाम हे २००२ ते २००७ या काळात राष्ट्रपती पदावर होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं कलाम यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवलं होतं. काँग्रेस व समाजवादी पक्षानंही त्यांच्या नावाला पाठिंबा दिला होता. नरेंद्र मोदी हे त्या काळात गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते. कलाम यांच्या राष्ट्रपतीपदाशी त्यांचा संबंध नव्हता. असं असतानाही पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

 

News English Summary: BJP state president and MLA of Kothrun assembly constituency Chandrakant Patil has come into the spotlight again due to a new statement. Chandrakant Patil has made a strange statement that Narendra Modi made Abdul Kalam the President.

News English Title: Chandrakant Patil has made a strange statement that Narendra Modi made Dr AJP Abdul Kalam the President news updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x