30 January 2025 8:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, दमदार कमाई होणार, अपडेट सह टार्गेट प्राइस नोट करा - NSE: VEDL Advik Capital Share Price | 2 रुपयांचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 11 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 539773 Bonus Share News | पटापट पोर्टफोलिओ वाढवा, ही कंपनी 1 वर 3 फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू अनेक - NSE: REDTAPE IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होईल, आयआरएफसी शेअरबाबत अपडेट, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC PPF Scheme | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेतील बचतीतून मिळतील 68,72,010 रुपये, गॅरेंटेड कमाई होईल NBCC Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस नोट करा, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: JIOFIN
x

स्थानिकांना रोजगार द्या | मनसेकडून गाड्या, जेसीबी, सीसीटीव्हीची तोडफोड

Chandrapur MNS, Vehicles office, CCTV, GRN

चंद्रपूर, १७ फेब्रुवारी: सरकारी कोळसा कंपनी WCL अंतर्गत काम करणाऱ्या GRN कंस्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात राज ठाकरे याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज (17 फेब्रुवारी) तोडफोड केली.

स्थानिकांना रोजगार दिला जात नसल्याच्या मुद्द्यावरून हा राडा घालण्यात आला . वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जीआरएन कार्यालयातील सामानाची मोडतोड करत कंपनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कोळसा कंपनी WCL च्या भटाळी क्षेत्रांतर्गत GRN ही कंस्ट्रक्शन कंपनी कोळसा खोदण्याचे काम करते. या कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार दिला जात नसल्याचा आरोप येथील कामगारांनी तसेच या भागातील नागरिकांनी केला होता. या मुद्द्यावरुन मनसेने जीआरएन कंस्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे अनेकवेळा चौकशी केली. त्यासाठी अनेकदा निवेदनही दिले. मात्र, जीआरएन या कंपनीच्या प्रशासनाने मनसे तसेच स्थानिकांच्या मागणीवर कोणतीही कार्यवाही केली नाही. परिणामी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तोडफोडीचा आक्रमक पवित्रा घेतला.

 

News English Summary: Raj Thackeray’s Maharashtra Navnirman Sena today (February 17) vandalised the office of GRN Construction Company, which operates under state-owned coal company WCL. The Radha was held on the issue of not providing employment to the locals.

News English Title: Chandrapur MNS vandalised the vehicles office and CCTV of GRN construction company news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x