22 December 2024 6:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

मराठा आरक्षण | छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला | बैठकीला अशोक चव्हाणही उपस्थित

Maratha reservation

मुंबई, २८ मे | मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याचा धक्कादायक निर्णय दिला. त्यानंतर मराठा समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली. दरम्यान, मराठा आरक्षणाचा हा तोडगा सोडवण्यासाठी खासदार संभाजीराजे सध्या महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. आज (२८ मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संभाजीराजे यांनी भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे देखिल उपस्थितीत होते. त्यांच्यात चर्चा झाल्यानंतर संभाजीराजे पत्रकार परिषद घेणार आहेत.

आज (२८ मे) १२ वाजता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर संभाजीराजेंनी महसूलमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचीही भेट घेतली. मराठा आरक्षणावर या दोघांशी चर्चा केल्यानंतर संभाजीराजे पत्रकार परिषद घेत आपली भुमिका मांडणार आहेत.

बाळासाहेब थोरात यांच्याशी संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भेट घेतली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्व पक्षीय नेतृत्त्व एकत्र आणण्यासाठी संभाजीराजेंचा भेटी घाठींचा सपाटा सुरुच आहे. संभाजीराजे असं म्हणाले की राजकीय पक्षांनी सध्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यासपेक्षा एकत्र येत मार्ग काढला पाहिजे. त्यामुळेच, कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी संभाजीराजे भेटी घेत आहेत. दरम्यान, या नंतर आज (२८ मे) संध्याकाळी पत्रकार परिषद घेत संभाजीराजे मराठा आरक्षणाबाबतची भूमिका मांडणार आहेत.

मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम राज्यातील सर्व पक्षांनी केलंय अशी मराठा समाजाची भावना झाली आहे. त्यात भाजपची भूमिका ही केवळ चालढकल करण्याची आहे. समाज आता यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही. एक वेगळं संघटन असावं, एक वेगळा पक्ष असावा, अशी समाजाची भावना आहे. आरक्षण मिळण्यासाठी हा लढवय्या समाज आक्रमक होईल असं मराठा समाजाचे पदाधिकारी बोलू लागले आहेत.

 

News English Summary: Chhatrapati Sambhajiraje met leader of Opposition Devendra Fadnavis today (May 28) at 12 noon. Later, Sambhaji Raje also met Revenue Minister and Congress leader Balasaheb Thorat. After discussing Maratha reservation with these two, Sambhaji Raje will hold a press conference and present his role.

News English Title: Chhatrapati Sambhajiraje met CM Uddhav Thackeray over Maratha Reservation news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x