15 November 2024 5:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा
x

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री; शुक्रवारपर्यंत पदाची शपथ घेणार?

CM Devendra Fadnavis

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालीच राज्याचा कारभार चालवणार असं शिवसेनेला ठणकावून सांगणारे देवेंद्र फडणवीस हे येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. सत्तेत समान वाटा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर सध्या ठाम असलेली शिवसेना एक पाऊल मागे घेईल, अशी भाजपची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २०१४ प्रमाणेच आपल्या दुसऱ्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तसंच शिवसेना भाजपासोबत सत्तेत सहभागी होईल, अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते सध्या शिवसेनेची मनधारणी करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसत आहे. देवेंद्र फडणवीस हे ३१ ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती एका नेत्यानं दिली. तसंच शिवसेनाही सत्तेत सहभागी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना इतर श्रेणीतले अपक्ष पाठिंबा देत आहेत. आत्तापर्यंत भाजपला ८ तर शिवसेनेला ४ अपक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या दोघांची आमदारसंख्या आता अनुक्रमे ११३ आणि ६० झाली आहे. मात्र, सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्षांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून शिवसेना देखील सत्तेमध्ये सहभागी असेल, अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते शिवसेनेच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचं देखील समजतंय. दरम्यान, याबदल्यात शिवसेनेला कोणती खाती मिळणार, याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद आणि काही मंत्रीपदं मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x