24 January 2025 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salary Account | बँकेत चक्कर न मारता सॅलरी अकाउंट बनेल पेन्शन अकाउंट, मिळतील अनेक फायदे, नोट करून ठेवा NTPC Share Price | एनटीपीसी शेअरवर ब्रोकरेज बुलिश, 36 टक्के तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत मोठे संकेत, ब्रोकरेज फर्मने दिला महत्वाचा सल्ला - NSE: TATATECH EPFO Pension Money | आता सर्व खाजगी कर्मचाऱ्यांना महिना 7,500 रुपये पेन्शन मिळणार, मोठ्या फायद्याची अपडेट आली Mutual Fund SIP | पगारदारांना SIP गुंतवणूक बनवेल 2.2 कोटींची मालक, 4000 रुपयांची गुंतवणूक ठरेल फायद्याची, पहा कॅल्क्युलेशन Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी 1 शेअर वर 3 फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: REDTAPE Property Rights | 90% पुरुष मंडळींना माहित नाही, मुलींना लग्नानंतर वडिलांची संपत्ती मिळवण्याचा अधिकार आहे, हे लक्षात ठेवा
x

भंडारा दुर्घटना | कुटुंबीयांची भेट घेताल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भावूक प्रतिक्रिया

CM Uddhav Thackeray, Bhandara district, government hospital

भंडारा, १० जानेवारी: जिल्हा शासकीय रुग्णालयातील दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आज भंडारा जिल्हा रुग्णालयात दगावलेल्या बाळांच्या आईची भोजापूर इथं जात भेट घेतली. त्यावेळी आपण हात जोडून उभं राहण्यापलीकडे काही करु शकलो नाही, अशी खंतही ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

या दुर्घटनेत जीव गमावलेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबांचीही त्यांनी भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक प्रतक्रिया दिली आहे. मी आता या कुटुंबीयांना भेटलो, यावेळी हात जोडून उभं राहण्याखेरीज माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते, कुटुंबीयांचे सांत्वन करता येईल असे शब्द निदाम माझ्याकडे नाहीयेत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेवर भाष्य केलं आहे.

दरम्यान, दुर्घटना प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करताना कोणालाही मुद्दाम आरोपी करणार नाही. पण दुर्लक्ष करणारी व्यक्ती सुटणार नाही. या समितीची समितीची जबाबदारी विभागीय आयुक्तांकडे देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकारीदेखील या समितीत आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ते मार्गदर्शक सूचना घालून देतील. भंडारा रुग्णालयातील घटनेनंतर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,’ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता कक्षात ‘आऊटबॉर्न’ आणि ‘इनबॉर्न’ असे दोन कक्ष आहेत. सर्व मृत बालके ‘आऊटबॉर्न’मधील आहेत. त्यातील दोघांचा होरपळून, तर आठ बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे राज्यासह अवघा देश हळहळला.

 

News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray has assured that strict action will be taken against the culprits after investigating the accident at the district government hospital. Uddhav Thackeray visited the mother of the baby at Bhojara district hospital in Bhojapur today. At that time, we could not do anything but stand with folded hands, said Thackeray while talking to the media.

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray Bhandara district government hospital news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x