25 December 2024 11:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

१५ जून २०२० पासून ऑनलाइन माध्यमातून शैक्षणिक वर्षाची सुरुवात

CM Uddhav Thackeray, school academic year

मुंबई, १५ जून: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये १५ जून २०२० पासून ऑनलाइन तसंच डिजिटल माध्यमातून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यास मान्यता दिली आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या तसंच ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येणार आहे.

ज्या गावात शाळा सुरु होणार आहेत, त्या भागात एक महिन्याभरात कोविड १९ चा एकही रुग्ण आढळला नसल्याची खात्री करुनच तेथे शाळा सुरु करण्यात येईल. कोविड १९ चा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष शाळा सुरु होणार नाहीत. डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. जुलै महिन्यापासून इयत्ता नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्यात येतील. तर, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑगस्ट महिन्यापासून शाळा सुरु होणार आहेत. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात शाळेत यावे लागेल. तर, अकरावीच्या विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालाधारित अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच महाविद्यालयात येता येईल.

शिक्षण विभागाने तयार केलेल्या आराखड्यानुसार पुढील मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात आली आहेत.

  • राज्यात जुलै पासून टप्प्याटप्प्याने प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची तयारी
  • शाळा सुरू करण्यापूर्वी एक महिना सदर गावात कोरोनाच्या एकही रुग्ण नसेल याची खात्री करून शाळा सुरू होणार
  • सरसकट शाळा सुरू होणार नाहीत
  • जिथे महिनाभरात एकही रुग्ण आढळला नाही तिथले नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग जुलैपासून सुरू करण्याची तयारी
  • सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून सुरू करण्याची तयारी
  • पहिली ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरपासून सुरू करण्याची तयारी
  • अकरावीचे वर्ग दहावीचा निकाल लागल्यानंतर आधी प्रवेश प्रक्रिया होणार
  • ती पूर्ण झाल्यावर वर्ग सुरू करण्याची तयारी
  • विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी एक दिवस आड वर्ग भरवण्याचीही मुभा
  • शाळा सुरू करण्यापूर्वी त्यांनी सॅनिटायझेशन करणे बंधनकारक
  • प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी बसवण्याची अट
  • शिक्षक, विद्यार्थ्यांना मास्क घालणं बंधनकारक
  • हे वेळापत्रक संभाव्य स्वरूपाचे असून स्थानिक परिस्थिती विचारत घेऊन त्याप्रमाणे शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

 

News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray has approved to start the school academic year. Chief Minister Uddhav Thackeray in a video conferencing of the school education department has approved to start the academic year from June 15, 2020 through online as well as digital medium.

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray has approved to start the school academic year News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x