22 January 2025 10:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
x

लॉकडाऊन की कडक निर्बंध? | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक

Chief Minister Uddhav Thackeray, emergency meeting, Lockdown

मुंबई, 4 एप्रिल: राज्यात कोरोना रुग्णांनाचा स्फोट झाला आहे. देशभरातील सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात समोर येत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा घट्ट होत असणारा विळखा पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. दरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. यामुळे यामध्ये आता कोणता निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शनिवारी मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांसह विविध क्षेत्रातील संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये लॉकडाऊनसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लॉकडाऊन लावायचा की, कडक निर्बंध लावायचे याविषयी चर्चा आजच्या बैठकीमध्ये केली जाईल आणि यानंतर मोठा निर्णय दिला जाऊ शकतो.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 3 वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. ऑनलाइन पध्दतीने ही मिटिंग होणार आहे. आज रविवार असूनही मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे, या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असूनही बाजारातील नागरिकांची गर्दी कमी झालेली नाही. यामुळे रुग्णसंख्येत सातत्याने वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

News English Summary: Corona patients have exploded in the state. Maharashtra has the highest number of patients across the country. Due to this, the situation in Maharashtra is getting worse day by day. Seeing the tightening of the corona over the last few days, Chief Minister Uddhav Thackeray has warned of a lockdown. Meanwhile, the Chief Minister has called an emergency meeting today. So it will be important to see what decision is made now.

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray has called an emergency meeting today news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x