ठाकरे सरकार फडणवीसांच्या काळातील विकास कामांची श्वेतपत्रिका काढणार
मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करण्यात येणार आहे. तसेच भूमिपुत्रांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल आणि राज्यातील जनतेला १० रुपयांत जेवण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असं आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज त्यांच्या अभिभाषणातून दिलं.
त्यानंतर मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी जी यांनी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात अभिभाषण केले. pic.twitter.com/SjYWQyg7yM
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 1, 2019
यावेळी शेतकरी, रोजगार, महिला, १० रुपयांत जेवणाची थाळी, आरोग्य, राज्यातील रस्ते, उद्योग, गडकिल्ले, बचतगट यासारख्या अनेक विषयांवर प्रभावीपणे उपाययोजना करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील असे मा. राज्यपालांनी सांगितले. pic.twitter.com/KdzRIBoMoX
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 1, 2019
पुढे राज्यपाल म्हणाले, “वाढती बेरोजगारी कमी करण्याला सरकारचे प्राधान्य आहे. रोजगारनिर्मिती आणि भूमिपुत्रांना नोकऱ्यांसाठी शासन कायदा करेल. शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी सर्व उपाययोजना हाती घेणार. त्यातून प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यात येईल. मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासासाठी विशेष स्तरावर शासनाकडून प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याचा प्रयत्न सरकार करेल,”असंही राज्यपाल आपल्या भाषणात म्हणाले.
दरम्यान, आज विधानसभेच्या अध्यक्ष आणि विरोध पक्षनेत्याची निवड करण्यात आली. यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. विकासकामांची माहिती मागवणार आहे. त्यावर किती खर्च झाला, किती कामे शिल्लक आहेत, कुठे होत आहेत. कामे का अडली आहेत, किती प्रगती झाली आहे. तातडीची कामे कोणती आणि कमी महत्वाची कामे कोणती, याचा लेखाजोखा मी मागविला असल्याचे सांगत फडणवीस सरकारच्या काळातील विकास कामांची श्वेतपत्रिकाच काढणार असल्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. तसेच मंत्रिमंडळाचा तात्पुरता विस्तार करणार असल्याचे ते म्हणाले.
“आजपासून कामकाजाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे पण आम्ही नेमके राज्याची परिस्थिती काय आहे त्याच अवलोकन करत आहोत.”
–@CMOMaharashtra— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 1, 2019
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS