22 January 2025 2:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

अमरावती शिवसेनेतील वाद विकोपाला; मातोश्रीवर बैठका

Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Anandrao Adsul, Abhijit Adsul, Anant Gudhe, Shivsena, Amaravati loksabha

अमरावती : माजी खासदार अनंत गुढे आणि शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांच्यातील वाद विकोपाला पेटला आहे. गुढे यांची पक्षातून हकालपट्टी करा असे आवाहन अडसूळ यांनी पक्षप्रमुखांना केले. या पार्श्वभुमीवर अनंत गुढे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मी माझे म्हणणे पक्षप्रमुखांसमोर मांडल्याचे ते म्हणाले. शिवसेना माझी आई आहे तर मातोश्री हे मंदिर आहे. निवडणुकीपूर्वी महाशिवरात्रीला स्मशानभूमीत झालेल्या सर्वपक्षीय कार्यक्रमाचा तो व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओने कोणी दुखावले असेल तर मी माफी मागतो असे गुढे म्हणाले. माझ्या हकालपट्टीच्या मागणीबद्दल उद्धव ठाकरे निर्णय घेतील असेही ते म्हणाले.

माजी खासदार अनंत गुढे आणि शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांच्यातील वाद विकोपाला पेटला आहे.अनंत गुढे यांना आज मातोश्रीवर बोलवण्यात आल्याची चर्चा असल्यानं अडसूळ गट नाराज झाला आहे. गुढे यांनी लोकसभा निवडणूकीत विद्यमान खासदार नवनित राणा यांना मदत केल्याचा आरोप करत गुढे यांना मातोश्रीवर थारा नको, गुढे गद्दार आहेत असा आक्षेप माजी आमदार आणि कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी केलाय. अभिजीत हे नवनित राणा यांच्याकडून पराभूत झालेले शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव आहेत. अनंत गुढे हे आनंदराव अडसुळांचा प्रचार करताना कधी दिसले नाहीत. त्यामुळे अशा गद्दारांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी अभिजीत अडसूळ यांनी केली आहे.

आजकाल मातोश्रीवर गद्दारांना माफ केलं जात. त्यामुळे आमच्यासारखे अंगावर केस घेतलेल्यांकडे दुर्लक्ष होत. या गद्दारांना पक्षातून बाहेर फेकले जावे असे ते म्हणाले. आनंदराव अडसूळ कसे नालायक आहेत, कसे वाईट आहेत हेच अनंत गुढे यांनी पेरले. गेल्या पाच वर्षात गुढेंनी आनंदरावांबद्दल विषाची पेरणी केली असेही अभिजीत अडसूळ म्हणाले.

अमरावतीमध्ये शिवसेनेचे उमेदवार आनंद अडसूळ यांचा पराभव झाला होता आता या पराभवाचे साईड इफेक्ट दिसू लागले आहे. माजी खासदार अनंत गुढे यांना आज मातोश्रीवर बोलवण्यात आल्याची चर्चा असल्यानं अडसूळ गट नाराज झाला आहे. अडसूळ यांच्या पराभवानंतर मंथन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आज अमरावतीच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत अमरावतीचा वाद मिटणार की वाढणार हे लवकरच समोर येईल. दरम्यान, अडसूळ गट अत्यंत आक्रमक झाला असून पराभवाचे खापर गुढे यांच्यावर फोडू लागला आहे. गुढे यांच्या पत्नीने खासदार नवनीत राणा यांचा सत्कार करून दिलेल्या शुभेच्छांचा व्हिडिओ आणि फोटो उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x