15 November 2024 11:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC
x

सत्तेची हाव इतकी होती की या खुर्चीला किती काटे आहेत ते आत्ता त्यांना जाणवतंय

Clashes between MahaVikas Aghadi, BJP President Chandrakant Patil

मुंबई, २ जुलै : तुमच्यात मतभेद आहे हे आम्ही बोलायचं नाही का? चौथीची मुलगीही सांगेल यांचं काही खरं नाही.. करोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे फक्त दोन तास मागितले असते तर त्यांनी दोन तासांमध्ये कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो आहे. असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा या शब्दांमध्ये टीकास्त्र सोडलं आहे.

“सत्तेची हाव इतकी होती की या खुर्चीला किती काटे आहेत ते आत्ता त्यांना जाणवायला लागलं आहे. पंढरपूरला गेलो तरी आक्षेप, नाही गेलो तरी आक्षेप. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादाचा फटका शिवसेनेला बसत असला, तरी सत्तेपायी तो त्यांना चालेलच. सत्तेची हाव मोठी आहे”, असा घणाघात चंद्रकांत पाटलांनी केला.

दरम्यान, महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये लॉकडाऊन वाढवल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा अंतर्गत धुसफूस आणि नाराजीनाट्य सुरू झालं आहे. अद्याप महाविकास आघाडीचा कुठलाही नेता अधिकृतपणे या विषयी बोललेला नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनीसुद्धा त्यांच्यात सूर मिसळल्याची सूत्रांची माहिती आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विश्वासात न घेता निर्णय घेतात, अशी तक्रार काही नेत्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली आहे. आता शरद पवार यासंदर्भात उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची शक्यता आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत राजकीय मतभेद निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. आता आघाडीत बिघाडी तर होणार नाही ना अशी दबक्या सुरात चर्चा आहे.

 

News English Summary: The lust for power was such that they are now beginning to realize how thorny this chair is. Objection even if you go to Pandharpur, objection even if you don’t go. Even if the Shiv Sena is hit by the internal dispute between the Congress and the NCP, it will continue to rule them.

News English Title: Clashes between MahaVikas Aghadi highlighted by BJP President Chandrakant Patil News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x