18 October 2024 11:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, मिळेल 104% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO Deepak Nitrite Share Price | दीपक नायट्रेट सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: DEEPAKNTR BMC Recruitment 2024 | मुंबई महानगरपालिकेत 690 रिक्त जागांसाठी भरती, पगार 1,42,000 रुपये, असा करा अर्ज - Marathi News RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका - NSE: RVNL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरने यावर्षी 41% परतावा दिला, तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN GTL Share Price | GTL पेनी शेअर 45 रुपयांची पातळी स्पर्श करणार, कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला - BSE: 513337 Horoscope Today | या राशींच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार, प्रमोशन वाढीचा देखील आहे योग, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य
x

नुकसान ग्रस्त भागाला पवारांची प्रत्यक्ष भेट तर फडणवीसांचा कार्यालयातून आढावा

CM Devendra Fadnavis, NCP President Sharad Pawar

मुंबई: राज्यातील शेतकर्‍यांचे अवकाळी पावसाने झालेले नुकसान आणि राज्य सरकारच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना याचा सविस्तर आढावा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. राज्याचे मुख्य सचिव, कृषी, मदत-पुनर्वसन, वित्त आणि विविध विभागांचे सचिव, भारतीय हवामान विभाग आणि विमा कंपन्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने उपस्थित होते. सुमारे ३२५ तालुक्यांमध्ये ५४,२२,००० हेक्टरवर पीकं बाधित झाली आहेत. ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिकं यामुळे बाधित झाली आहेत. प्रभावित भागाचे तत्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

राज्यातील सत्ता स्थापनेवरून भारतीय जनता पक्ष-शिवसेनेत वाद सुरू असताना दुसरीकडे शरद पवार हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आहेत. शरद पवार सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नाशिकमध्ये दाखल झाले. इगतपुरीमधील भात पिकाच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांचं नुकसान आणि त्यांच्या व्याथा ते जाणून घेत आहेत. आमच्या हातचं पीक गेलंय. खूप नुकसान झालंय. जगावं की मरावं असा प्रश्न आमच्या समोर आहे. मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही, असं शेतकऱ्यांनी पवारांना सांगितलं.

पवार यांनी दवंगे या शेतकऱ्यांकडून किती द्राक्ष बाग आहे, कधी छाटली, आता शिल्लक किती राहिली, पुढील वर्षासाठी कसे नियोजन करणार ही सर्व माहिती घेतली. उपस्थित सर्व शेतकऱ्यांना नैराश्य येऊ देऊ नका असा सल्ला दिला. पावसामुळे नाशिक जिल्ह्यात जवळ जवळ सगळ्याच भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामध्ये सर्वात मोठे नुकसान हे द्राक्ष उत्पादक शेतकरयांचे झाले आहे. द्राक्ष बागांसोबत हाता तोंडाशी आलेले मका, सोयाबीन, बाजरी आणि टोमॅटो या पिकांचे नुकसान झाले. सोंगलेले पीक आज पाण्यात भिजलेले पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x