22 January 2025 6:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
x

वेदांत प्रकल्प गुजरातला गेला | तरुणांना नोकऱ्यांची गरज, पण शिंदे गट 'हिंदू गर्व गर्जना' यात्रा काढून तरुणांना विचलित करण्यास सज्ज

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | वेदांता लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी फॉक्सकॉन यांनी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प आणि डिस्प्ले फॅब मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करण्यासाठी गुजरात सरकारशी सामंजस्य करार केला आहे. वेदांत या प्रकल्पात १,५४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गांधीनगर येथे झालेल्या कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

वेदांत अध्यक्षांनी ट्विट करून दिली माहिती :
वेदांतचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्याने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले, “ऐतिहासिक प्रसंग. गुजरातमध्ये नवीन वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यात येणार असल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. कंपनीने 1.54 लाख कोटी रुपयांची ऐतिहासिक गुंतवणूक केल्याने भारताची आत्मनिर्भर सिलिकॉन व्हॅली प्रत्यक्षात येण्यास मदत होणार आहे.

गुजरातमध्ये 1 लाख लोकांना रोजगार मिळेल :
यावेळी बोलताना गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले की, गुजरातमध्ये प्रकल्प उभारण्यासाठी दोन्ही कंपन्या १,५४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. या सुविधेमुळे एक लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील. “या प्रकल्पामुळे पंतप्रधान मोदी यांचे भारतात एक मजबूत उत्पादन आधार तयार करण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल,” असे ते यावेळी म्हणाले. यामुळे आमची इलेक्ट्रॉनिक्स आयात कमी होईल आणि आमच्या लोकांना एक लाख थेट कुशल रोजगार मिळेल. त्यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे पटेल म्हणाले.

शिंदे गटाची ‘हिंदू गर्व गर्जना’ यात्रा :
दरम्यान, तरुणांना एकाबाजूला नोकऱ्यांची गजर आणि दुसऱ्या बाजूला देशात महागाई – बेरोजगारी हे प्रमुख विषय असताना शिंदे गट भाजपच्या सांगण्यावर धार्मिक मुद्यांवर वातावरण तापवू पाहतोय अशी चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी एकनाथ शिंदे गट ‘हिंदू गर्व गर्जना’ यात्रा काढण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. परिणामी बेरोजगारी आणि महागाई हे मुख्य मुद्दे प्रसार माध्यमांच्या हेडलाईनमध्ये जातील आणि धामिर्क मुद्द्यांना बळ मिळेल. त्यामुळे तरुणाईची चर्चा आणि वाद हे धामिर्क मुद्यांवर केंद्रित होतील अशी राजकीय व्युहरचना आहे असं वृत्त आहे. मात्र शिंदे गटाच्या या राजकारणाला राज्यातील तरुण वर्ग बळी पडणार का ते पाहावं लागणार आहे.

शिंदे गटाच्या आमदार-खासदारांची काल मुंबईमध्ये बैठक पार पडली. यावेळी संघटनात्मक दृष्ट्या पदाधिकारी, आमदार-खासदार यांची बैठक घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी यात्रा सुद्धा काढण्यात येणार आहे आणि सरकारचे काम तळागाळातील आपल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा काम होणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मात्र यामागील खरं कारण वेगळं असल्याचं माध्यमांकडे वृत्त आहे. भाजपाची एक टीम शिंदे गटाचा सर्व अजेंडा ठरवते आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी शिंदे यांच्याकडे पाठवते. त्याला पडद्यमागून राजकीय बळ देखील जातं. पेठामधील बैठक सुद्धा त्याचाच प्रकार होता. आता शिंदे गटाला धार्मिक मुद्यांवर केंद्रित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत असं वृत्त आहे. देशात महागाई आणि बेरोजगारी प्रचंड वाढल्याने लोकांच्या मनात रोष आहे आणि त्यावरून लोकांना विचलित करण्यासाठी धार्मिक मुद्यांना पुढे करण्याची रणनीती आखली आहे असं खात्रीलायक वृत्त आहे. त्याचाच भाग म्हणजे शिंदे गटाची ‘हिंदू गर्व गर्जना’ यात्रा असल्याचं म्हटलं जातंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde Hindu Garva Garjana Yatra will be star soon check details 14 September 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x