22 January 2025 10:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025
x

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 40 आमदारांना घेऊन दिल्लीवाऱ्या नेमक्या कशासाठी?, धक्कादायक आणि महत्वाची माहिती समोर येतेय

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde ​​| महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवाऱ्या सुरु होणार आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे हे आपल्यासोबत 40 आमदारांनीही घेऊन दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व आमदारांसाठी महाराष्ट्र सदनामध्ये रूम्स सुद्धा बूक करण्यात आल्या आहेत. मात्र भाजपच्या गोटातून मिळालेल्या खात्रीलायक वृत्तानुसार शिंदे गटातील आमदारांची दिल्लीतील परेड ही निवडणूक आयोगाशी संबंधित असल्याचं जातंय, मात्र कारण दुसरंच आहे. त्याचा थेट संबंध वेदान्तासोबत जोडला जातोय, पण ते पूर्णपणे कथित असल्याचं वृत्त आहे.

राज्यात वेदांता प्रकरण समोर आल्यानंतर बेरोजगारीचा मुद्दा अत्यंत गडद झाल्याने भाजपला जे नको होतं तेच घडल्याने राजकीय कोंडी झाली आहे. वेदांता प्रकल्प हा गुजरातला गेला आहे आणि त्यात रिव्हर्स करण्यासारखं काहीच आहे हे माहिती असल्याने, दिल्लीत वेगळ्या कारणाने भेटी घेऊन महाराष्ट्रात आल्यावर वेदांता किंवा इतर प्रकल्पांच्या नावाने राजकीय पुड्या सोडायच्या अशी रणनीती आहे. त्यात उद्योग मंत्री उदय सामंत यांचा फोन फडणवीस उचलतील की नाही याची शाश्वती देता येणार नाही, तर त्यांना मोदी भेट कुठून देतील हे समजण्या इतके शिंदे शहाणे आहेत. तसेच या मुद्द्यांनंतर धार्मिक मुद्दे लुप्त झाल्याने ते पुन्हा जोरदारपणे माध्यमांसमोर येणं गरजेचं आहे असं दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठांना वाटतं आहे. तसेच शिंदे गट दिल्लीत आल्यावर त्यांना मोदी-शहा यांनी पाठवलेले प्रतिनिधी भेटून त्यांना हिंदुत्वाची आग तीव्र करण्याची रणनीती सांगतील. तसेच प्रचार करताना मोदींना केंद्रस्थानी ठेवण्याचे आदेश देण्यात येतील असं वृत्त आहे.

ग्राम पंचायत निवडणुकीतील शिंदे गटाचं वास्तव :
राज्यात कालच ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि त्यात महाविकास आघाडी समर्थक पॅनलची आकडेवारी मोठी ठरल्याने राज्यातील वातावरण हे भाजपसाठी पोषक नाही असं दिल्लीतील भाजप वरिष्ठांनी निष्कर्ष काढला आहे. त्यात मोदी-शहांची सर्वात मोठी चिंता म्हणजे शिंदे गटात तब्बल ४० आमदार (अपक्ष सोडून) आणि १२ खासदार असून त्यात ग्रामीण भागातील आमदार-खासदारांची संख्या खूप मोठी आहेत. तर दुसरीबाजूला उद्धव ठाकरे यांच्याकडे १५-१६ आमदार असून त्यातील १० पेक्षा अधिक आमदार हे मुंबई-कोकण पट्ट्यातील आहेत, जेथे ग्रामपंचायत निवडणुकाच नव्हत्या. तसेच उद्धव ठाकरेंच्या गटातील इतर आमदारांच्या विधानसभा क्षेत्रात या ग्रामपंचायत निवडणुका नव्हत्या. असं असतानाही शिंदे गटाला केवळ ४१ जागा आणि शिवसेनेला ३७ जागा मिळाल्याने दिल्लीतील भाजपने आश्चर्य व्यक्त केले आहे. म्हणजे सोबत असलेले ४० आमदार आणि १२ खासदार यांची बेरीज केली तरी ५२ होते, पण ग्रामपंचायतीत केवळ ४१ जागा म्हणजे भाजपने भीती व्यक्त केली आहे. त्यातही राजकीय पक्षाच्या चिन्हाचा वापर नसल्याने शिंदेचा मतदार किती समजणं कठीण असून, शिवसेनेचा पारंपरिक मतदार कुठेच जाणार नाही असा अंदाज दिल्लीतील भाजपने दोन्ही बाजूच्या खासदार-आमदारांच्या संख्येवरून व्यक्त केला आहे. त्यात उद्या न्यायालयीन लढाईत धनुष्यबाण चिन्हं सुद्धा निसटलं तर शिंदे गटातील अनेकांचं राजकीय आयुष्य संपुष्टात येईल असं म्हटलं जातंय. त्यामुळे या आमदारांना राजकीय तंबी सुद्धा दिली जाऊ शकते असं वृत्त आहे.

बुलेट ट्रेन इव्हेन्ट :
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका २ महिन्यावर आहेत आणि मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका सुद्धा तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसंबंधित इव्हेन्ट मुंबईत घडवून आणण्याची दिल्लीतील भाजप नेत्यांची इच्छा आहे. त्यासाठी याच दिल्लीत भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री आश्विणी वैष्णव यांचीही भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. कारण या प्रकल्पाची गुजरातच्या भागातील तयारी त्यांच्या अखत्यारीत होतं आहे. प्रकल्प पूर्ण होण्याची टार्गेट लाईन २०२६ असली तरी मुंबईतील कामाचा शुभारंभ नावाने इव्हेन्ट करता येईल का याची चाचपणी शिंदेंसोबत होऊ शकते असं म्हटलं जातंय.

माध्यमांकडे कितीही वृत्त येतं असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोन उचलत नाहीत असं भाजपमधील नेत्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं. मात्र शिंदेंना पुढे करून गुजरातच्या फायद्याचा गोष्टीत लवकरात लवकर मार्गी लावण्याची गुजरात लॉबीची योजना आहे. त्यात सुप्रीम कोर्टात शिंदेनी घटनात्मक बाजू कमजोर असल्याने मोठी धक्कादायक निकाल येतील असं दिल्लीतील भाजपला वाटत असल्याने शिंदे गटाला भाजपमध्ये आणण्याची रणनीती सुद्धा तयार करण्यात आली आहे असं खात्रीलायक वृत्त आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde will move to Delhi with 40 Supporting MLAs check details 20 September 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x