ग्रामपंचायत निवडणूक | मुख्यमंत्र्यांची शिवसेना संपर्कप्रमुखांसोबत महत्वाची बैठक
मुंबई, १९ डिसेंबर: महाराष्ट्रातील तब्बल १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर (Election Commission announces election program for 14 thousand 234 Gram Panchayat in Maharashtra) करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १८ जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे.
दरम्यान शिवसेना देखील या निवडणुकीच्या निमित्ताने जोरदारपणे कामाला लागली आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ग्राम पंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनीती आखत आहेत. त्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल जिल्हा प्रमुखांशी चर्चा करुन ग्राम पंचायत निवडणुकीत शिवसेनेला नंबर वन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत संपर्कप्रमुखांना रणनीती बनवण्याचे आदेश दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी शिवसेनेची खलबतं सुरु आहेत. Chief Minister Uddhav Thackeray himself is planning Shiv Sena’s strategy for Gram Panchayat elections.
आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व शिवसेना संपर्कप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली. शिवसेना महाराष्ट्रातील 14 हजार 234 ग्राम पंचायतींच्या निवडणुका लढवणार आहे. राज्यातील ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होत आहे. A meeting of all Shiv Sena liaison chiefs in Maharashtra was held today in the presence of Uddhav Thackeray.
News English Summary: Meanwhile, Shiv Sena has also started working hard on the occasion of this election. Chief Minister Uddhav Thackeray himself is planning Shiv Sena’s strategy for Gram Panchayat elections. For this, they have been holding meetings for the last two days. Shiv Sena chief Uddhav Thackeray yesterday discussed with the district chief and ordered to make Shiv Sena number one in the Gram Panchayat elections. After that, the Chief Minister held a meeting of Shiv Sena’s liaison chief today. The meeting also directed the liaison chief to formulate a strategy. Shiv Sena’s agitation is going on at the Chief Minister’s ‘Varsha’ residence.
News English Title: CM Uddhav Thackeray called important meeting over Grampanchayat Election 2020 news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS