25 December 2024 9:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

'बुलेट ट्रेन' प्रकल्प म्हणजे पांढरा हत्ती; उपयोग कोणाला होणार? मुख्यमंत्री प्रकल्पावर नाखूष

PM Narendra Modi, Bullet Train, CM Uddhav Thackeray

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पाला पांढरा हत्ती म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पावर सगळ्यांच्या सोबत बसून विचार व्हायला पाहिजे, असे सांगताना बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार आहे, या प्रकल्पामुळे किती उद्योगधंद्याना चालना मिळणार आहे, हे पाहणे महत्वाचे असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

‘बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार आहे, त्याच्यामुळे इथे किती उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे आणि तो जर उपयोगाचा असेल… तर पटवून द्या’ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सरकार स्थापन होण्याआधी जे पाच वर्षे सरकार होतं त्यांनी अनेक असे प्रकल्प निर्माण केले, मंजूर केले, उभे केले, जे पांढऱ्या हत्तीसारखे नंतर समोर आले आणि आपण त्यांना स्थगिती दिली. त्यातला एक बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे. बुलेट ट्रेन महाराष्ट्रात येणार की नाही? असा प्रश्न संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला असता मुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्तर दिले आहे.

अहमदाबाद आणि मुंबई शहरादरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्याची घोषणा २०१५ मध्ये करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत आधी २०२२ ठरवण्यात आली होती, पण आता ती २०२३ पर्यंत पुढे गेली आहे.

केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर गुजरातमध्ये देखील शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे आणि त्यासंबंधित याचिका देखील न्यायालयात दाखल झाल्या आहेत. मात्र मोदी आणि शहांचा या प्रकल्पामागील हट्टाच कारण समोर आलं होतं आणि सदर माहिती संबंधित कंत्राड मिळालेल्या कंपनीच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. सदर वृत्तानुसार बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत येणारी अनेक कंत्राटं भारतीय जनता पक्षाला देणगी देणाऱ्या कंपन्यांनाच दिली गेली असल्याचं वृत्त ‘द क्विंट’ या इंग्रजी संकेतस्थळानं दिलं होतं.

 

Web Title:  CM Uddhav Thackeray criticizes on Bullet Train a dream project of Prime Minister Narendra Modi in a special interview given to Saamana Newspaper.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x